Friday, May 20, 2022

महसूलमंत्री थोरात म्हणाले तो क्षण माझ्या जीवनातील सर्वात आनंददायी

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:निळवंडे धरणाच्या लाभक्षेत्रातील जिरायतदार शेतकऱ्यांच्या शेतात निळवंडे धरणाखालील कालव्यांतून हक्काचे पाणी

खळाळेल व पाण्यापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हासू उमटेल, तो क्षण माझ्या जीवनातील सर्वात आनंददायी अनुभव राहील.

यासाठी निळवंडे धरणाखालील कालव्यांची कामे जलदगतीने पूर्ण करण्यात येत असून लाभक्षेत्रात उजव्या कालव्यातून पाणी वाहून नेण्यासाठी आवश्यक असलेला म्हाळादेवी अॅक्वाडक

(जलसेतू) हाही पूर्णत्वास जात आहे. या सर्व कामांवर माझे बारकाईनं लक्ष आहे. म्हाळादेवी जलसेतूच्या कामाची कामाची प्रगती समाधानकारक आहे, असे प्रतिपादन राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.

दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना वरदान ठरणाऱ्या निळवंडे धरणाच्या उजव्या कालव्यावरील म्हाळादेवी जलसेतूसह इतर कामाची पहाणी महसूलमंत्री थोरात यांनी रविवारी दुपारनंतर केली.

यावेळी जलसंपदा विभाग नाशिकचे मुख्य अभियंता डॉ. संजय बेलसरे, अधीक्षक अभियंता अरुण नाईक, कार्यकारी अभियंता प्रमोद माने यांनी क्रेनच्या साह्याने मंत्री थोरात यांना जेलसेतूवर

उतरवून कामाच्या प्रगतीची माहीती दिली. मंत्री थोरात यांनी म्हाळादेवी येथील जलसेतू व उजव्या कालव्यावरील रात्रंदिवस सुरू असलेल्या यंत्रणांचा आढावा घेऊन त्यांच्या अडचणी समजावून

घेत हे काम लवकरात लवकर होण्यासाठी प्रशासनाला सूचना दिल्या. तसेच या भागातील शेतकऱ्यांच्या समस्या थोरात यांनी समजून घेतल्या.या पहाणी दौऱ्यात मंत्री थोरात यांच्या समवेत जिल्हा बँक

उपाध्यक्ष ॲड. माधवराव कानवडे, लोकनेते अशोक भांंगरे, अगस्तिचे उपाध्यक्ष सीताराम गायकर, ज्येष्ठ नेते मीनानाथ पांडे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दादापाटील वाकचौरे, जिल्हा परिषद सदस्य रामहरी कातोरे,

मिलिंद कानवडे आदी उपस्थित होते. दरम्यान, निळवंडे धरणावरील विश्रामगृहावर अधिकाऱ्यांसमवेत विविध समस्यांवर चर्चा झाली. याप्रसंगी थोरात म्हणाले, निळवंडे धरणाखालील उजव्या व डाव्या

कालव्यांची कामे रात्रंदिवस सुरू आहेत. या वर्षी ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर मधे दोन्ही कालव्यांतून पाणी सोडून चाचणी घेण्याचा मानस आहे. यासाठी आपल्या सर्वांनाच लक्षपूर्वक काम करायचे आहे. अकोले

तालुक्यातील शेतकऱ्यांनी कालव्यांच्या कामासाठी नेहमीच सहकार्य केले. शासन स्तरावर काही अडचणी असल्यास त्याची प्राधान्याने सोडवणूक करू. दुष्काळी भागातील जनतेला

लवकरात लवकर पाणी देणे हा आपल्या जीवनाचा ध्यास आहे. यावेळी कार्यकारी अभियंता प्रमोद माने यांनी सुरू असलेल्या कामांची सविस्तर माहिती दिली.

ताज्या बातम्या

नगर ब्रेकिंग: टेम्पो पलटी होऊन मोठा अपघात या अपघातात दोनजण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्याच्या संगमनेर तालुक्यातून जाणार्‍या पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील माहुली घाटात मक्याची कणसे घेऊन जाणारा टेम्पो पलटी होऊन अपघात झाला. या अपघातात दोनजण...

मोटारसायकल, स्कूटर चालकांनो सावधान!जाणून घ्या नवा नियम

माय महाराष्ट्र न्यूज:हेल्मेट घातले की आपण निर्धास्तपणे दुचाकी वाहन चालवू शकू आणि आपल्याला कोणत्याही नियमाची अडचण येणार नाही असे तुम्हाला वाटत असल्यास तुम्ही सावध होण्याची...

महिला अ‍ॅथलीटने लग्नापूर्वी शारीरिक संबंध ठेवण्याबाबत मोठे विधान

माय महाराष्ट्र न्यूज:अ‍ॅथलीट म्हटलं तर दररोजचा व्यायाम आलाच. फिट राहण्यासाठी रोज सकाळी पहाटेची झोप मोड करत व्यायाम करावाचं लागतो. तसेच सेक्स लाईफबाबतही अनेक खेळाडूंना कॉम्प्रॉमाईस...

नगर जिल्ह्याच्या शेजारील जिल्ह्यातील घटना:मुलाने आईला प्रियकरासोबत बघितले आक्षेपार्ह अवस्थेत मग काय घडले नको ते

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा औरंगाबाद जिल्ह्यातून एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.आईच्या अनैतिक संबंधामुळे...

बँकेच्या नियमात मोठा बदल, व्यवहारासाठी आता या गोष्टी आवश्यक

माय महाराष्ट्र न्यूज:केंद्र सरकार लोकांच्या सुविधा आणि सुरक्षितता लक्षात घेऊन आवश्यक ती पावले उचलत आहे. गेल्या काही वर्षांपासून देशात डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी मोदी...

ATM मधून कॅश काढण्याच्या नियमात बदल, अन्यथा

माय महाराष्ट्र न्यूज:बँकिंग व्यवहारात एटीएममधून पैसे काढणं हा प्रत्येकाच्या गरजेचा भाग बनला आहे. पण अनेकदा एटीएम कार्डमधील माहितीचा गैरवापर करून ग्राहकांच्या खात्यातून परस्पर पैसे...
error: Content is protected !!