Wednesday, May 25, 2022

सोन्याच्या दरात वाढ; चांदीही महागली, चेक कर नवे दर

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:मागील आठवड्यापर्यंत सोन्यात सतत घसरण होताना दिसत होता. मात्र आता ऐन लग्नसराईत मागणी वाढल्याने

सोन्या-चांदीच्या दरात वाढ होताना दिसत आहे. आजही सोन्या-चांदीच्या दरात वाढ झालेली पाहायला मिळाली आहे. सकाळच्या व्यवहारात

सोन्याचा भाव 51 हजारांच्या वर तर चांदीचा भाव 62 हजारांच्या वर गेला आहे.मल्टीकमोडिटी एक्सचेंज वर, सोमवारी सकाळी 24 कॅरेट शुद्ध सोन्याची फ्युचर्स किंमत 7 रुपयांनी

किरकोळ वाढून 51,350 रुपये प्रति 10 ग्रॅम झाली. यापूर्वी सोन्याचा व्यवहार 51,259 रुपयांपासून सुरू होता, परंतु खरेदी आणि मागणी वाढल्याने लवकरच सोन्याची फ्युचर्स किंमत 0.01 टक्क्यांनी

वाढून 51,350 रुपयांवर पोहोचली. गेल्या सलग सत्रात सोन्याच्या दरात घसरण झाली होती.चांदीच्या दरातही आज तेजी दिसून येत आहे. एमसीएक्सवर आज सकाळच्या व्यवहारात चांदीचा

भाव 52 रुपयांनी वाढून 62,600 रुपये प्रति किलो झाला. यापूर्वी चांदीचा व्यवहार 62,450 रुपयांवर सुरू होता, परंतु मागणी आणि खरेदी वाढल्याने लवकरच त्याची किंमत 0.08 टक्क्यांनी वाढून 62,600 वर पोहोचली.

आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोन्याच्या दरात थोडीशी घसरण झाली आहे. आज सकाळी अमेरिकन बाजारात सोने 0.29 टक्क्यांनी घसरून 1,876.05 डॉलर प्रति औंस झाले. मात्र, याउलट

चांदीच्या दरात किंचित वाढ झाली. आज सकाळच्या व्यवहारात चांदी 0.6 टक्क्यांच्या वाढीसह 22.3 डॉलर प्रति औंसवर विकली जात आहे.

ताज्या बातम्या

मुळा-निळवंडे धरणाच्या कालव्यावरील एकूण १७ उपसा सिंचन योजनांचे सर्वेक्षणासाठी २ कोटी ३७ लाखांहून अधिक निधी-मंत्री शंकरराव गडाख

नेवासा/सुखदेव फुलारी नगर जिल्ह्यातील मुळा धरणाच्या जलाशय-नदीवरील आणि निळवंडे धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्यावरील एकूण १७ उपसा सिंचन योजनांचे प्राथमिक सर्वेक्षण करण्यात येणार असून यासाठी...

वर पक्षाकडून वधू कुटुंबीयांचा प्रत्येकी 10 लाख रुपयांचा विमा

भेंडा(नेवासा) नेवासा तालुक्यातील भेंडा येथील काळे परिवाराने विवाह सोहळ्यानिमित्त एक अनोखा उपक्रम राबविला.वरपक्षाने लग्नाच्या दिवशी वधूच्या कुटुंबातील 12 व्यक्तींची प्रत्येकी 10 लाखा रुपयांची विमा पॉलिसी...

साखर निर्यातीवर बंदी नसल्याचा विस्माचा खुलासा

नेवासा/सुखदेव फुलारी काल केंद्र सरकारने अचानक साखर निर्यातीवर बंदी घातल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आणि त्यामुळे साखर उद्योग आणि ऊस उत्पादक शेतकरी यांच्या मध्ये चिंतेचे वातावरण...

प्रसिद्ध गायिकेचा MMS व्हिडिओ लीक; सिनेसृष्टीत खळबळ

माय महाराष्ट्र न्यूज:अलीकडे सोशल मीडियावर जर कोणाची सगळ्यात जास्त चर्चा असेल तर ती म्हणजे भोजपुरी गायिका शिल्पी राजची. युट्युबसह अनेक प्लॅटफॉर्मवर काही आक्षेपार्ह लोकांनी शिल्पी...

खाद्यतेल स्वस्त होणार, सरकारचा मोठा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:वाढत्या महागाईपासून जनतेला दिलासा देण्यासाठी मोदी सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पेट्रोल-डिझेल आणि गॅस सिलेंडरनंतर आता खाद्यतेलही स्वस्त होणार आहे. सरकारने खाद्यतेलावरील...

सोने दरात घसरण, तर चांदीचा भाव वधारला

माय महाराष्ट्र न्यूज:आंतरराष्ट्रीय बाजारात आलेल्या घसरणीमुळे आज सकाळी भारतीय बाजारात सोने दरात घसरण झाली आहे. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या वाढीनंतर आज बुधवारी...
error: Content is protected !!