माय महाराष्ट्र न्यूज:कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून सर्व शाळा आणि कॉलेजेस बंद होते. त्यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीनं शिक्षण देण्यात येत होतं. गेल्या वर्षी बोर्डाच्या
परीक्षाही करण्यात आल्या होत्या. त्यानंतर बोर्डाच्या विद्यार्थ्यांचा निकाल विशेष मूल्यांकन पद्धतीनं लावण्यात आला होता. यंदा बोर्डाच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनं घेण्यात आल्या आहेत.
त्यामुळे बोर्डाच्या परीक्षांचा निकाल नेहमीपेक्षा उशिरा जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र आता बोर्डाच्या निकलाबाबत एक नवीन अपडेट समोर आली आहे.
राज्यातील सर्व विभागांचे दहावी आणि बारावी बोर्डाचे पेपर पूर्णपणे तपासून झाले आहेत अशी माहिती SSC आणि HSC बोर्डाकडून देण्यात आली आहे. त्यामुले राज्यात लवकरच दहावी आणि बारावीचे
निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. कोरोनामुळे परीक्षा उशिरा घेण्यात आल्यात त्यामुळे बोर्डासमोर निकाल वेळेत लावण्याचं मोठं आव्हान होतं. तरीही यंदा हे निकाल वेळेतच लागण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे द्वारे दहावी आणि बारावीच्या परीक्षांचा निकाल तयार केला जात आहे. काही मीडिया रिपोर्ट्स प्रमाणे स्टेट बोर्डाचे दहावी परीक्षेचा निकाल हा येत्या
20 जूनपर्यंत तर बारावी परीक्षेचा निकाल हा 10 जूनपर्यंत जाहीर करण्यात येणायची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नसली तरी सूत्रांनी अशी माहिती दिली आहे.
राज्यातील सर्व शहरांमध्ये शिक्षक जोमानं पेपर तपासणीला लागले होते. त्यात काही भागांमध्ये तांत्रिक अडचणीही आल्या. मात्र आता याचा सामना करून बोर्डानं पेपर तपासणी पूर्ण केल्याचं सांगितलं आहे.