माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी व देवळाली परीसरातील एक सामाजिक कार्यकर्त्या व संस्थेच्या
अध्यक्षाला नाशिक येथील एका तरुणीने हनिट्रॅप च्या जाळ्यात अडकल्याची चर्चा तालुक्यात होत आहे.या हनिट्रॅप च्या माध्यमातून संबंधित संस्थेच्या अध्यक्षाला देवळाली व राहुरी फॅक्टरी
भागातील काही तरुणांनी ब्लॅक मेल करत तब्बल दोन लाख रुपये उकळल्याची घटना घडली असल्याचे तालुक्यात दबक्या आवाजात चर्चा आहे.देवळाली प्रवरा व राहुरी फॅक्टरी परीसरातील
एका संस्थेचा अध्यक्ष हा कामानिमित्त नाशिक येथे जायेत करत असतो.येथील एका तरुणानीने त्यास आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकले.संबधित संस्थेचा अध्यक्ष त्या तरुणाच्या प्रेमात पडला.
अन् आता त्या तरुणीने संस्थेच्या अध्यक्षावर हनिट्रॅपचे जाळे फेकले आहे.सध्या त्या तरुणीने एका बहादर च्या मध्यस्थीने ब्लॅकमेलिंग करत दोन लाख रुपये उकळले आहे.दरम्यान त्या तरुणीने
अजून पैसे मागणी केली आहे.यामुळे तो व्यक्ती चांगलाच हवालदिल झाला आहे असे बोले जात आहे. याबाबत लवकरच सर्व समोर येणार आहे.