माय महाराष्ट्र न्यूज:गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे सर्वत्र भयावह परिस्थिती निर्माण झाली असताना सर्वत्र पुन्हा एकदा चिंतेचे वातावरण पसरलं आहे.
आता कुठं परिस्थिती पूर्वपदावर येत असल्याचे वाटत असताना आता आणखी एका नवीन विषाणूने डोकं वर काढलं आहे. ब्रिटनमध्ये ‘मंकीपॉक्स’
विषाणूचे एक प्रकरण समोर आले आहे. ज्या व्यक्तीमध्ये या विषाणूची पुष्टी झाली आहे, तो नुकताच नायझेरियातून आला होता.यूके हेल्थ सिक्युरिटी एजन्सीच्या माहितीनुसार, मंकीपॉक्स
हा एक दुर्मिळ विषाणूजन्य संसर्ग आहे जो सहजपणे पसरत नाही. मात्र, या विषाणूने जगाची चिंता पुन्हा वाढवली आहे.यूके हेल्थ सिक्युरिटी एजन्सीच्या रिपोर्टनुसार, संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात
आलेल्या लोकांना या विषाणूचा संसर्ग होऊ शकतो. हा विषाणू त्वचा, श्वसनमार्गातून किंवा डोळे, नाक आणि तोंडातून आपल्या शरीरात प्रवेश करू शकतो. तसेच, संक्रमित प्राणी देखील या
विषाणूचे सक्रिय वाहक असू शकतात. अशा प्राण्याच्या संपर्कात आल्याने, किंवा विषाणू-दूषित वस्तूंद्वारे देखील ‘मंकीपॉक्स’ पसरू शकतो. डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगोमध्ये ‘मंकीपॉक्स’ची
सर्वाधिक प्रकरणे आढळतात. मुख्यतः आंतरराष्ट्रीय प्रवासामुळे किंवा आयात केलेल्या प्राण्यांमुळे हा विषाणू पसरतो.
नेमकी कोणती आहेत लक्षणे…यूके हेल्थ सिक्युरिटी एजन्सीच्या मते, मंकीपॉक्स विषाणू सामान्य आजार आहे, हा फक्त काही प्रकरणांमध्ये गंभीर रूप धरण करू शकतो. मात्र, बहुतेक संक्रमित रुग्ण
अल्पावधीत बरे होतात. मात्र ‘मंकीपॉक्स’ हा एक दुर्मिळ विषाणू आहे. ताप आलेल्या व्यक्तीमध्ये जे सामान्य लक्षणे दिसतात, तीच लक्षणे या विषाणूने प्रभावित रुग्णामध्ये दिसून आली आहे.
या विष्णूची लागण झालेल्या व्यक्तीच्या संपूर्ण शरीरावर आणि चेहऱ्यावर पुरळ दिसू लागते. याशिवाय ताप, स्नायू दुखणे, डोकेदुखी, थंडी वाजून येणे आणि थकवा अशी लक्षणे दिसू शकतात. जागतिक आरोग्य
संघटनेच्या म्हणण्यानुसार, मंकीपॉक्स रोगावर सध्या कोणतेही अचूक उपचार नाहीत. या रोगाची लागण झाल्यावर, लक्षणे कमी करण्यासाठी रुग्णावर उपचार केले जातात. मंकीपॉक्स
रोखण्यासाठी कांजण्यांवरचे लसीकरण 85 टक्के प्रभावी असल्याचे सिद्ध झाले आहे.