Tuesday, May 17, 2022

सुजय विखेंच्या टीकेला रोहित पवाराचं जोरदार प्रत्युत्तर

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:कर्जत जामखेडमधील अधिकार्‍यांवर माझा दबाव नक्कीच आहे. सामान्य लोकांची कामं करत असताना अधिकाऱ्यांवर

माझा दबाव असतोच असे वक्तव्य कर्जत जामखेडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केलं आहे. आमदार जर लोकांच्या हितासाठी खोलात जाऊन काम करत असेल, तर को-ऑर्डिनेशनचं

काम करण्यासाठी मला जास्त पीए लागतीलच असेही रोहित पवार म्हणाले. भाजपचे खासदार सुजय विखे पाटील यांनी रोहित पावर यांच्यावर टीका केली होती. त्यांच्या टीकेला रोहित पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

सुजय विखे पाटील यांनी विविध मुद्यावरुन रोहित पवार यांच्यावर टीका केली होती. कर्जत जामखेड तालुक्यात एक नाही तर 10 आमदार आहेत. कारण आमदारांच्या पीए ची संख्याच तेवढी आहे,

असं म्हणत सुजय विखेंनी रोहित पवारांना टोला लगावला होता. त्यांच्या या टिकेला रोहित पवार पवारांनी आज प्रत्युत्तर दिले आहे. मुळात ते पीए नाहीत तर कॉर्डिनेटर आहेत. कदाचित सुजय विखे यांना

हेच सांगायचं होतं की, त्याठिकाणी अतिशय चांगला काम सुरु आहे. कामं योग्य पद्धतीने होत आहेत की नाहीत ते पाहण्यासाठी माझे अनेक कॉर्डिनेटर त्या ठिकाणी कार्यरत असल्याचे रोहित पवार म्हणाले.

कर्जत-जामखेड तालुक्यातील एक तरी सरकारी अधिकारी हसताना दिसतो का? त्यांच्या चेहऱ्यावर कायमच गांभीर्य असते. तालुक्यात एक नाही तर दहा आमदार आहेत, कारण आमदारांना पीए च तेवढे आहेत असा टोला खासदार सुजय विखेंनी

आमदार रोहित पवारांना लगावला होता. कर्जत तालुक्यातील शिरपूर येथे सभामांडपाचे उद्घाटन सुजय विखे यांच्या हस्ते झाले. यावेळी खासदार विखे बोलत होते. त्यांच्या या टीकेनंतर रोहित पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

ताज्या बातम्या

मनी प्लांटशी संबंधित या 5 चुका नका करू…नाहीतर होईल नुकसान, जाणून घ्या

माय महाराष्ट्र न्यूज:वास्तुशास्त्रानुसार मनी प्लांट लावल्याने आर्थिक समृद्धी येते. घरामध्ये माळरान ठेवल्याने सुख-समृद्धी येते. याशिवाय मनी प्लांट हे रोप ऑफिस किंवा दुकानातही ठेवता येते....

महाराष्ट्रातील मोठी बातमी! महाराष्ट्रातील निवडणुकांबाबत सुप्रिम कोर्टाचा मोठा आदेश

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी घ्यायच्या याबाबत सुप्रिम कोर्टात सुनावणी सुरु आहे. जिथे पावसाळा आहे तिथे मान्सून नंतर निवडणूका घ्या असा...

ऑनलाइन क्लास सुरू असताना प्राध्यापिकेच्या मोबाइलवर आला अश्लील व्हिडिओ

माय महाराष्ट्र न्यूज:ऑनलाईन क्लास सुरू असतानाच विद्यार्थिनींसह प्राध्यापिकेच्या स्मार्टफोनवर अश्लील मेसेज आणि व्हिडिओ आल्याचा धक्कादायक प्रकार नांदेड शहरात उघडकीस आला. विष्णुपुरी ग्रामीण तंत्रनिकेतन महाविद्यालयात हा...

या गोष्टींमुळे महिला पुरुषांकडे आकर्षित होतात

माय महाराष्ट्र न्यूज:काही वेळा पुरूष सहज काहीतरी वागून किंवा बोलून जातात. मात्र त्यांच्या छोट्या-छोट्या गोष्टी महिलांवर छाप सोडतात. जाणीवपूर्वक प्रयत्न करणाऱ्या नाही तर महिलांच्या...

या पठ्ठ्याने म्हणून दोनशे क्विंटल कांदा मोफत वाटला

माय महाराष्ट्र न्यूज:वर्षभर कष्ट करुन कधी आस्मानी तर कधी सुलतानी संकटाचा सामना शेतकऱ्याला करावा लागतो. अनेक अडचणींवर मात करत उभं केलेलं पिक अनेकदा आस्मानी...

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात खळबळजनक बातमी : काँग्रेस महाविकास आघाडीतून बाहेर पडणार?

माय महाराष्ट्र न्यूज:गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीतील अंतर्गत धुसपूस वाढत चालल्याचे पाहायला मिळत आहे. अनेकविध मुद्द्यांमुळे महाविकास आघाडीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येऊ लागला आहे. स्थानिक...
error: Content is protected !!