माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर:राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वरिष्ठ पातळीवर भाकरी फिरविली असली तरी खालच्या पातळीवर अनेक ठिकाणी विविध कारणांमुळे नाराजी असल्याचे दिसून येत आहे.
अशातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष व अहमदनगर जिल्ह्यातील घनश्याम शेलार यांनी हैदराबाद येथे भारत राष्ट्र समिती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व तेलंगणा चे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेश केला आहे.
अहमदनगर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी आपल्या पक्षाचा महाराष्ट्रात विस्तार करण्यास सुरुवात केली आहे. मराठवाड्यात सभा झाल्यानंतर नगर जिल्ह्यातही त्यांना प्रतिसाद मिळत आहे.
नेमकी विधानसभेची तयारी सुरू असताना बीआरएसने महाराष्ट्रात लक्ष घातले आहे. त्यामुळे पुढील सोय लक्षात घेता विविध पक्षांतील नेत्यांकडून प्रतिसाद मिळेल, अशी अटकळ राव यांची असावी. ती खरी ठरताना दिसत आहे. नगर जिल्ह्यात याची सुरवात राष्ट्रवादी
काँग्रेसपासून होत असल्याचे दिसते.घन:श्याम शेलार यांची राजकीय सुरुवात भाजपपासून झाली. त्यानंतर ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले. ते पक्षाचे जिल्हाध्यक्ष होते. मात्र, पुन्हा पाक्षपासून दुरावले. नंतर पुन्हा पक्षात आल्यावर विधानसभेची उमेदवारीही मिळाली. आता
पुढील विधानसभेला ते इच्छुक असल्याचे मानले जात असतानाच श्रीगोंदा मतदारसंघातून पक्षाने माजी आमदार राहुल जगताप यांना ताकद देण्यास सुरुवात केली आहे. जगताप यांनीही अलीकडे झालेल्या छोट्या मोठ्या निवडणुकांत आपला करिष्मा पुन्हा दाखवून दिला आहे. त्यामुळे
आता पक्षाकडून त्यांनाच उमेदवारी दिली जाण्याची चिन्हे दिसू लागल्याने शेलार अस्वस्थ आहेत. त्यातूनच त्यांनी नवीन पर्यायाची चाचपणी सुरू केल्याचे सांगण्यात येते.यावेळी भारत राष्ट्र समितीचे महाराष्ट्र राज्याचे प्रभारी जीवनजी रेड्डी, बीआरएस पक्षाचे राष्ट्रीय महासचिव हिमांशू तिवारी तसेच मीडियाचे प्रमुख जयंतजी देशमुख आदी पदाधिकारी उपस्थित होते.
शेलार यांच्याबरोबर संजय आनंदकर (जिल्हा अध्यक्ष ओबीसी सेल),शरद पवार (सरपंच),प्रकाश निंभोरे (दिग्दर्शक बाजार समेटी), आबासाहेब शिंदे (सदस्य कुकडी साखर कारखाना), विलास भैलुमे (माजी चारमन)केशव झेंडे (सरपंच),शहाजी इथापे (सरपंच),चंद्रकांत पवार (चर्मन सोसायटी), प्रकाश पोटे,प्रशांत शेलार, सिद्धेश आनंदकर, प्रवीण शेलार,
संजय वागस्कर,संदिप दहातोंडे (वाहतूक सेना अध्यक्ष)शाम जरे (सेवादल) यांनी प्रवेश केला आहे.