Wednesday, May 25, 2022

सरकारने ड्रायव्हिंग लायसन्सच्या (DL) नियमात केले बदल

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:जर तुम्ही तुमचा ड्रायव्हिंग लायसन्स बनवण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. केंद्र सरकारने ड्रायव्हिंग लायसन्स बनवण्याच्या नियमात बदल केले आहेत.

नव्या नियमांचा फायदा सर्वसामान्यांना नक्की मिळणार आहे. या नियमांच्या अंमलबजावणीनंतर तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स (DL) मिळवण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या

(RTO) मध्ये फेऱ्या माराव्या लागणार नाहीत. केंद्र सरकारने बनवलेले ड्रायव्हिंग लायसन्सचे नवे नियम पूर्वीपेक्षा खूपच सोपे झाले आहेत.ड्रायव्हिंग लायसन्स बनवण्याच्या सुधारित नियमानुसार, आता

तुम्हाला RTO ला जाऊन कोणत्याही प्रकारची ड्रायव्हिंग टेस्ट द्यावी लागणार नाही. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडून 1 जुलै 2022 पासून नवीन नियम लागू केले जातील.

नवीन नियम लागू झाल्यानंतर वाहन चालविण्याचा परवाना मिळविण्यासाठी प्रतीक्षा यादीच्या प्रतीक्षेत असलेल्या कोट्यवधी लोकांना दिलासा मिळणार आहे. या नियमानुसार RTO ला जाऊन कोणत्याही प्रकारची ड्रायव्हिंग टेस्ट द्यावी लागणार नाही.

याशिवाय ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यासाठी आरटीओमध्ये परीक्षेसाठी थांबण्याची सुद्दा गरज राहणार नाही. नवी नियमानुसार आता कोणत्याही मान्यताप्राप्त ड्रायव्हिंग ट्रेनिंग स्कूलमध्ये

DL साठी नोंदणी करू शकता. येथून ट्रेनिंग घेतल्यानंतर तिथून परीक्षा उत्तीर्ण व्हावी लागेल. परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्यांना या ट्रेनिंग सेंटरमधून प्रमाणपत्र देण्यात येईल . या प्रमाणपत्राच्या आधारे

तुमचा DL तयार केला जाईल. त्यामुळे RTOमध्ये जाऊन परिक्षा देण्याचे कष्ठ सुद्धा वाचले आहेत.ड्रायव्हिंग लायसन्ससाठी एक अभ्यासक्रम मंत्रालयाने तयार केला आहे. हे थिअरी आणि प्रात्याक्षिक

अशा दोन भागात विभागलेले आहे. लाइट मोटर व्हेईकल (LMV) या अभ्यासक्रमाचा कालावधी चार आठवडे आहे, जो 29 तास चालेल. प्रात्याक्षिकांसाठी तुम्हाला रस्ते, महामार्ग, शहरातील रस्ते, गावातील रस्ते,

रिव्हर्सिंग आणि पार्किंग इत्यादींवर प्रात्याक्षिकांसाठी 21 तास द्यावे लागतील. उर्वरित 8 तास तुम्हाला थेअरी शिकवली जाईल.रस्ते आणि वाहतूक मंत्रालयाने प्रशिक्षण केंद्रांसाठी काही

मार्गदर्शक तत्त्वे आणि अटीही निश्चित केल्या आहेत. तुमच्यासाठी या मार्गदर्शक तत्त्वांची माहिती असणे देखील महत्त्वाचे आहे. दुचाकी, तीन चाकी आणि हलकी मोटार वाहनांसाठी

प्रशिक्षण केंद्रासाठी किमान एक एकर जागा. अवजड प्रवासी/माल वाहने किंवा ट्रेलरसाठी प्रशिक्षण केंद्राजवळ दोन एकर जागा असणे आवश्यक आहे.प्रशिक्षकासाठी किमान 12 वी पास

असणे आवश्यक आहे. तसेच, त्याला किमान 5 वर्षांचा ड्रायव्हिंगचा अनुभव असावा.ड्रायव्हिंग सेंटर्सचा अभ्यासक्रम थेअरी आणि प्रात्याक्षिक 2 भागांमध्ये विभागलेला आहे. प्रशिक्षण केंद्रात बायोमेट्रिक

यंत्रणा असणे आवश्यक आहे.मध्यम आणि अवजड वाहन मोटार वाहनांसाठी अभ्यासक्रमाचा कालावधी 6 आठवड्यात 38 तासांचा आहे. थिअरी क्लासचे 8 तास आणि प्रात्याक्षिकाचे 31 तास असतील.

ताज्या बातम्या

मोदी सरकार साखर निर्यातीवर बंदी घालण्याच्या तयारीत ?

माय महाराष्ट्र न्यूज:जगात साखरेचं सर्वाधिक उत्पादन भारतात होतं. तर साखरेच्या निर्यातीत भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. जगभरात भारतापेक्षा जास्त फक्त ब्राझील हा देश सर्वाधिक साखर...

मोठी बातमी:पंकजा मुंडेंना राष्ट्रवादी येण्याची आॅफर

माय महाराष्ट्र न्यूज:भाजपमध्ये ओबोसींचा अपमान केला जात आहे. काल औरंगाबादेत जल आक्रोश मोर्चामध्ये केंद्रीय राज्यमंत्र्यांना बाऊंसरची भूमिका वठवावी लागली. हे पाहून हसांव की रडावं, असा...

पुढील वर्षी साखर कारखाने सुरू करण्याबाबत अजित पवारांनी घेतला ‘हा’ निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात अद्यापही 16 लाख मेट्रीक टन ऊसाचे गाळप राहिले आहे. मराठवाडा, सोलापूर, सातारा, उस्मानाबाद, बीड या भागातील सर्वात जास्त ऊस शिल्लक राहिल्याने...

मोठी बातमी: इंदोरीकर महाराजांचे आठ दिवसांचे नियोजित कार्यक्रम रद्द

माय महाराष्ट्र न्यूज:कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांचे आठ दिवसांचे नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. इंदोरीकर महाराजांचं महाराष्ट्रात मोठं नाव आहे. ते प्रसिद्ध...

नगरसह या जिल्ह्यांत पावसाचा अंदाज 

माय महाराष्ट्र न्यूज:मागच्या चार दिवसांपूर्वी कोल्हापूर, सांगली, सोलापूर आणि विदर्भातील काही भागात मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावली होती. दरम्यान पुढील चार दिवस पुन्हा पावसाची शक्यता...

सरकारने बदलला सीम घेण्यासंदर्भात महत्त्वाचा नियम

माय महाराष्ट्र न्यूज:आपल्याला सिम कार्ड घ्यायचं असेल तर काय करावं लागतं? आपण कोणत्याही मोबाइल स्टोरवर जाऊन आपलं ओळखपत्र देतो, त्याद्वारे सिम अलॉट केलं जातं आणि...
error: Content is protected !!