माय महाराष्ट्र न्यूज:आरोग्य भरतीची परीक्षा पुन्हा होणार आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली असून, त्याच्या तारखा
लवकरच जाहीर केल्या जातील असे टोपे यांनी स्पष्ट केले आहे. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांशी चर्चा झाल्याचेही टोपेंनी सांगितलं.
ते पिंपरी-चिंचवडमध्ये माध्यमांशी बोलत होते. आरोग्य भरती संदर्भात विधानसभेत पोलिसांना सखोल चौकशी करण्यासादर्भत आदेश दिले होते. पोलिसांचा डिटेल अंतिम रिपोर्ट अत्यावश्यक आहे.
ड वर्गाचा पेपर पूर्ण व्हायरल झाला होता. त्यामुळे आम्ही पुन्हा ‘ड’ वर्गाची परीक्षा घेणार आहे. मुख्यमंत्री यांच्यासोबत चर्चा केली असून, याबाबत त्यांचंही मत लक्षात घेतलं आहे. दोन्ही परीक्षा
लवकर घेण्याचा निर्णय घेण्याचा मंत्रीमंडळाचा निर्णय आहे. त्याचबरोबर नामांकित संस्थांकडून परीक्षा घेण्याचादेखील निर्णय यामध्ये झाला असल्याचे टोपे म्हणाले.कोरोनाच्या चौथ्या लाटेबाबत
काय म्हणाले टोपेयावेळी राजेश टोपे यांनी कोरानाच्या चौथ्या लाटेबाबतही भाष्य केले. ते म्हणाले की, कुठेही कोरोनाची चौथी लाट असल्याचा माझा सूतोवाच नाही. सध्या कमी प्रमाणात कोरोना
बाधितांची संख्या वाढत आहे. महराष्ट्राने यापूर्वी मोठी रुग्णसंख्या पहिली आहे. मुंबई, पुणे, नाशिक, ठाणे याठिकाणी थोडी रुग्ण संख्या वाढल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.