माय महाराष्ट्र न्यूज:बनावट ग्राहक पाठवून गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील
गुहा येथील घरातच असलेल्या कुंटणखान्याचा पोलिसांनी पर्दाफाश केला. ही घटना सोमवार दि. 9 मे रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास गुहा शिवारात घडली. याप्रकरणी कुंटणखाना चालक महिलेवर
राहुरी पोलीस ठाण्यात पिटांतर्गत गुरनं व कलम -॥ 388/2022 या व मुली यांचे व्यापारास ( प्रतिबंध ) कायदा 1958 चे कलम 3, 4, 5, 7, 8 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून तीन पीडित महिलांची
सुटका करण्यात आली आहे. यावेळी संबंधित महिलांचे मोबाईल हस्तगत करण्यात आले असून अन्य साहित्यही जप्त करण्यात आले आहे.दरम्यान, गुहा गावात भर मध्यवस्तीत हा व्यवसाय सुरू होता व त्याची
माहिती गावातील नागरिकांना नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.राहुरी तालुक्यातील गुहा येथील एक महिला आरोपी पीडित महिलांकडून वेश्या व्यवसाय करुन घेत असल्याची खात्रीशीर
माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरुन त्या ठिकाणी छापा मारला असता तीन पीडित महिलांची सुटका करण्यात आली. तर एका महिला आरोपीविरुध्द राहुरी पोलीस ठाण्यात पिटाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पथक तयार करुन गुहा येथे बनावट ग्राहक पाठवून पंचासमक्ष छापा टाकला.
एका महिला आरोपी विरुध्द राहुरी पोलीस ठाण्यात प्रचलीत कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.. या कारवाईमुळे Dysp संदीप मिटके आणि pi दराडे यांच्या पथकाचे गावातील नागरिकांकडून कौतुक होत आहे.
सदरची कारवाई श्री.मनोज पाटील पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, यांचे मार्गदर्शनाखाली Dysp संदीप मिटके, PI दराडे, Psi बोकील, Asi राजेंद्र आरोळे, HC औटी, HC जायभाये,
लक्ष्मण बोडखे, PN विकास साळवे, पो. कॉ. नितीन शिरसाठ, पो. कॉ. आजिनाथ पाखरे, रविंद्र कांबळे, म.पो.कॉ. तृप्ती गुणवंत आदींनी केली.