Tuesday, May 24, 2022

नगर जिल्ह्यातील शेवटच्या शेतकऱ्यांचा ऊस जोपर्यंत गाळपाला जाणार नाही तोपर्यंत एकही कारखाना बंद करू नका : जिल्हाधिकारी

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:आज ११ मे रोजी अहमदनगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू सभागृहात जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्या अध्यक्षते मध्ये आर जे डी

साखर सहसंचालक मिलिंद भालेराव आणि उपस्थित सर्व साखर कारखानदारांचे प्रतिनिधी जिल्ह्यातील सर्व शेतकरी संघटना व शेतकरी पक्षाचे पदाधिकारी यांची अतिरिक्त ऊस आणि ऊस

वाहतूक यंत्रणा या विषयावर बैठक झाली दिनांक ४ मे रोजी जिल्हाधिकारी यांच्यासमवेत अहमदनगर जिल्ह्यातील साखर कारखानदार यांची बैठक झाली होती या बैठकीत फक्त साखर कारखानदार

आपली बाजू सोयीस्कर पद्धतीने जिल्हाधिकाऱ्यांना सांगण्यात यशस्वी झाले होते परंतु प्रहार जनशक्ती पक्षाच्या अहमदनगर जिल्हाअध्यक्ष अभिजीत पोटे यांनी बैठकीत शिरकाव करून वस्तुस्थिती

जिल्हाधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिल्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने पुन्हा कारखानदारांसह साखर सहसंचालक मिलिंद भालेराव व जिल्ह्यातील सर्व शेतकरी संघटना व शेतकरी पक्षाच्या नेत्यांना बोलावून आज दिनांक ११ मे रोजी बैठक घेतली

या बैठकीत प्रथमता जिल्हाधिकारी महोदयांनी प्रहार जिल्हाध्यक्ष अभिजित पोटे यांना कारखाने सुरू करण्यासाठी तालुका ऊस वाहतुकीच्या बाबतीत आपण काय मदत करू शकता यावर विचारले

असता अभिजीत पोटे यांनी ऊस वाहतूकदार शेतकरी बांधवांना भाववाढ द्या, उस नोंद प्रक्रियेमध्ये पारदर्शकता आणा, साखर उद्योग व इथेनॉल प्रकल्पावरील २५ किलोमीटर हवाई अंतराची अट रद्द करणे बाबत वस्तुस्थिती मांडण्याची विनंती

केली असता जिल्हाधिकाऱ्यांनी अनुमोदन देताच ऊस वाहतूक दर शेतकरी बांधवांना भाववाढ देणेबाबत ऊस उत्पादनाबरोबरच जोडधंदा म्हणून कित्येक शेतकरी बांधव हार्वेस्टर ट्रॅक्टर ट्रक इत्यादी

वाहने साखर कारखानदारी मध्ये ऊस वाहतूक करण्यासाठी वापरली जातात परंतु आज डिझेल भाव वाढीबरोबर वाहतूक भाववाढ कित्येक वर्षापासून झालेली नाही पूर्वीचे डिझेल दर ५२ रुपये प्रति लिटर असताना

वाहतूक दर १०० किलोमीटर ला ४२० रुपये प्रतिटनेज प्रमाणे होता आज डीझेल दर १०३ रुपये प्रति लिटर आहे त्याच बरोबर वाहनांचे सुटे पार्ट टायर्स ऑइल आणि आरटीओ खर्च इन्शुरन्स ड्रायव्हरची पगार २०००० रुपये

प्रति महिना झालेला असून साखर कारखाने ऊस वाहतूक करार करताना या वाहतूकदारां साठी कुठलाही कायदा अस्तित्वात नसताना मनमानी पद्धतीने साखर कारखाने करार करून वाहन कागदपत्रांच्या

आधारे वाहन मालकांची कुठली संमती न घेता लाखो रुपये कर्ज काढून परस्पर बँक लोन सेटलमेंट करून आजपर्यंत हजारो वाहन मालकांची कुटुंबासह सिबिल रेकॉर्ड पूर्णतः खराब केले आहे आम्हाला

कायमस्वरूपी ऊस वाहतूक दरासाठी कायदा नियमावली करून वाढत्या महागाईनुसार भाव वाढ मिळावी जिल्हाधिकारी महोदय यांनी केलेल्या आवाहनानुसार आम्ही सर्व आमच्या संघटनेचे सदस्य असलेले वाहन मालक सद्यपरिस्थितीत

शंभर किलोमीटर ला कमीतकमी ९०० रुपये प्रति टन याप्रमाणे भाववाढ दिल्यास कारखानदारांनी भाववाढीचे मागणी मंजूर केल्याचे पत्र दिल्यास दोन दिवसात ऊस तोड हार्वेस्टर मागे चालणारी वाहने पूर्ण क्षमतेने

देण्याचे नियोजन करू पण वाहतूक भाव वाढ ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या माथी न मारता शासन किंवा साखर कारखानदारांनी याची जबाबदारी उचलावीसाखर उद्योग व इथेनॉल प्रकल्प परिसरात

ऊस मुबलक प्रमाणात उपलब्ध असून देखील कारखाने २५ किलोमीटर अंतरावरून ऊस न आणता १०० किलो मीटर पेक्षा जास्त दुरून दुसऱ्या जिल्ह्यातून ऊस वाहतूक करून ऊस आणला जातो (एच अँड टी) ऊस

वाहतूक यंत्रणेत प्रचंड प्रमाणात कारखाने भ्रष्टाचार करतात दुरून आणलेल्या उसाचा दर हा कारखान्याच्या जवळील ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून पण आकारला जातो सरासरी मध्ये वाहतूक दर लावला जातो या यंत्रणेत सर्व जबाबदार आणि दोषी कारखानदार

बरोबर साखर सहसंचालक (आर जे डी) आणि राज्य साखर आयुक्त हे जबाबदार आहेत अहमदनगर जिल्ह्यात किती अतिरिक्त ऊस नोंद झाल्याची कल्पना असताना त्यांनी कुठलेच नियोजन केले नाही तसेच कारखानदारांनी ऊस वाहतूकदार यांना किती

कालावधीसाठी ऊस तोड कामगार लागतील याची कल्पना दिली नाही ऊस तोड कामगार आप आपल्या गावी निघून गेले आहेत अहमदनगर जिल्ह्यात नोंदणीकृत सात लाखापेक्षा जास्त मेट्रिक टन ऊस शिल्लक आहे बगैर नोंदीचा उसाची कुठलीही नोंद

उपलब्ध नाही हाऊस नोंदणीकृत उसापेक्षा जास्त असल्याचे शंका व्यक्त केली महसूल यंत्रणा वापरून बगैर नोंदीच्या उसाची आकडेवारी जाहीर करण्याची जिल्हाधिकाऱ्यांना मागणी केली कारखानदारांनी

ऊस तोड हार्वेस्टर खरेदी करून पूर्ण ऊस गाळप झाल्याशिवाय साखर कारखाने बंद करू नयेत तसेच दुसऱ्या जिल्ह्यातील ऊसतोड हार्वेस्टर बंद झाले आहेत ती यंत्रणा अहमदनगर जिल्ह्यात बोलावून घेऊन भाववाढ देऊन त्वरित चालू करण्याचे

नियोजन करावे जिल्हाध्यक्ष अभिजित पोटे बोलताना म्हणाले साखर कारखानदार आजपर्यंत साखर सहसंचालक यांनी बोलावलेल्या बैठकीला स्वतः चेअरमन आणि कारखान्याचे एम डी , शेतकी अधिकारी कधीही उपस्थित राहिलेले नाहीत साखर सहसंचालक मिलिंद

भालेराव यांना कारखान्याचे अधिकारी अगदी सहजतेने हाताळतात आणि बैठकीला कोणतेही निर्णय घेण्याचे अधिकार नसलेल्या अधिकारी साखर कारखानदार अशा बैठकांना पाठवून देतात ऊस नोंद प्रक्रियेमध्ये पारदर्शकता आणा

साखर कारखाने परिसरातील शेतकरी बांधवांची ऊस नोंद घेण्यास टाळाटाळ करतात आणि मुळातच ही नोंद प्रक्रिया गट ऑफिसमधील कर्मचारी कारखाना प्रशासनाच्या वशिलेबाजी ने नोंदी घेतल्या जातात परिसरात मुबलक ऊस उपलब्ध

असताना सुद्धा १०० किलोमीटर पेक्षा बाहेरच्या जिल्ह्यातील ऊस आणला जातो व परिसरातील ऊस जाणीवपूर्वक तोडण्यास उशीर केला जातो बाहेरील ऊस कमी दरात उपलब्ध होतो आणि वाहतुकीचे दर साखर कारखाने बाहेरून आणलेल्या

ऊस दराप्रमाणे परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी बांधवांच्या माथी हेदर लावली जातात ऊस नोंद प्रक्रिया मुळात (आर जे डी) साखर सहसंचालक यांच्यामार्फत ऊस नोंद करणारे मोबाईल ॲप तयार करून

शेतकरी बांधवांना घरबसल्या नोंद करता येईल असे ॲप तयार करावेत व या ऊस नोंदीचा डेटा साखर सहसंचालक यांच्या मार्फत ज्या त्या साखर कारखान्यांना पाठवला जावा यावर जिल्हाधिकारी

महोदयांनी उपस्थित असणाऱ्या साखर कारखान्यांचे प्रतिनिधींना ऊस वाहतूक दर वाढविण्याबाबत दोन दिवसात निर्णय घेण्याचे सांगितले आणि (आर जे डी) साखर सहसंचालक मिलिंद भालेराव यांना शेवटच्या शेतकऱ्याचा ऊस

तुटेपर्यंत एकही कारखाना बंद करू नका तसेच उपस्थित शेतकरी प्रतिनिधींना आश्वासन देत ऊस नोंद प्रणालीमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी व हवाई २५ किलोमीटर अंतराची अट रद्द करण्यासाठी योग्य

अहवाल शासनाकडे तातडीने पाठवत असल्याचे जाहीर केले रघुनाथ दादा पाटील शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रुपेंद्र काले जिल्हाध्यक्ष अनिल अवताडे यांनी अशोक साखर कारखान्याच्या गलथान कारभारामुळे ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे.

अशोक कारखान्याचा १लाख ४० हजार मेट्रिक टनांपेक्षा जास्त ऊस शिल्लक असल्याची बाब जिल्हाधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिली पावसापूर्वी ऊस तोड न झाल्यास पुणे येथील साखर आयुक्त कार्यालयावर शेतकऱ्यांचे धडक मोर्चा येणार असल्याचे

जाहीर सांगितले प्रहार चे जिल्हाध्यक्ष अभिजित पोटे यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी जिल्हाधिकारी महोदयांनी तातडीने बैठक लावल्याबद्दल त्यांचे आभार मानले या बैठकीला उपस्थित संघटनां पैकी प्रहार जनशक्ती पक्ष, रघुनाथदादा

 शेतकरी संघटना, स्वाभिमानी शेतकरी संघटना उपस्थित होत्या कार्यक्रमाचे आभार स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब लवांडे यांनी मानले.

ताज्या बातम्या

SBI च्या ग्राहकांनो सावधान

    माय महाराष्ट्र न्यूज:भारत सरकारच्या केंद्रीय संस्था प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांना महत्वाचे आवाहन केले आहे.   एसबीआयच्या ग्राहकांनी त्यांच्या खात्यांमध्ये प्रवेश करण्यासाठी...

नगर ब्रेकिंग:कारच्या अपघातात पिता-पुत्राचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज:अज्ञात वाहन व कारच्या अपघातात कारमधील पिता-पुत्राचा मृत्यू झाला. बाजीराव त्रिंबक मिसकर (वय 40) व ओम बाजीराव मिसकर (वय 13, दोघे रा. जळगाव...

महाराष्ट्रातील खळबळजनक बातमी:३ वर्षांच्या मुलीला रक्तपेढीतील रक्तातून HIVचा संसर्ग

माय महाराष्ट्र न्यूज:नागपुरात तीन वर्षांच्या मुलीला रक्तपेढीतून मिळालेल्या रक्तातून एचआयव्हीचा संसर्ग झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घडलेल्या धक्कादायक प्रकारामुळं नागपुरात खळबळ उडाली...

नगर जिल्ह्यात आजोबांप्रमाणेच सुजय विखेंचा ‘नव्या प्रयोगा’चा मनसुबा

माय महाराष्ट्र न्यूज:काँग्रेसमधील एकेकाळचे दिग्गज नेते दिवंगत बाळासाहेब विखे यांनी १९९१ मध्ये जेव्हा प्रथम पक्ष सोडला, त्यावेळी नगर जिल्ह्यात आपल्या गटाचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण...

राज्यातील ओबीसींचे हक्काचे आरक्षण मिळाल्या शिवाय निवडणुका घेऊ नये-मुरकुटे

नेवासा राज्यातील ओबीसींचे हक्काचे आरक्षण मिळाल्या शिवाय निवडणुका घेऊ नये अशी मागणी माजी आ.बाळासाहेब मुरकुटे यांनी केली. नेवासा तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज तहसीलदार रुपेशकुमार...

नगर ब्रेकिंग: संतापजनक:विवाहितेवर सासरच्या दारातच अंत्यसंस्कार

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील निळवंडे येथे शेततळ्यातील पाण्यात विवाहित महिलेचा मृतदेह तरंगताना आढळून आला. शीतल सतिष केरे असे मयत विवाहितेचे नाव...
error: Content is protected !!