Friday, May 20, 2022

बीड-नगर रस्त्यावर मोठा अपघात, प्रसिद्ध व्यावसायिक कुटुंबातील चौघांचा मृत्यू

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर रस्त्यावर बुधवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास धामणगाव जवळील वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार खड्डयात गेली आणि भीषण अपघात झाला.

या अपघातात बीड शहरातील प्रसिद्ध व्यावसायिक टेकवाणी कुटुंबातील तीन भाऊ व एक तरूण असे चौघे जागीच ठार झाले.तर एक वीस वर्षीय मुलगा मात्र बालंबाल बचावला असुन त्याला उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

बीड शहरातील प्रसिद्ध व्यावसायिक शंकर शेठ टेकवाणी काही कामानिमित्त दोन भाऊ व दोन पुतणे असे पाच जण क्रेटा कारने बुधवारी (११ एप्रिल २०२२) सायंकाळी सातच्या सुमारास घरून

नगरला जाण्यासाठी निघाले. भरधाव वेगातील गाडी रात्री दहाच्या सुमारास नगर रस्त्यावरील धामणगाव गावाजवळ असताना चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. गाडी रस्त्याच्या बाजूला खोल खड्ड्यामध्ये जाऊन आपटली.

या अपघातात गाडीमध्ये शंकर शेठ टेकवाणी (वय ५५), त्यांचे बंधू सुनील टेकवाणी (वय ५०), शंकर टेकवाणी (वय ४८ ), तर पुतण्या लखन महेश टेकवणी (वय ३०) सर्व राहणार कारंजा (बीड) या

चौघांचा जागीच मृत्यू झाला. गाडीमधील मृत शंकर टेकवणी यांचा मुलगा निरज (वय २० वर्षे) हा मात्र या भीषण अपघातात थोडक्यात बचावला. त्याला उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

गाडी कोण चालवतो होते याची माहिती उपलब्ध झालेली नाही. मोठा आवाज झाल्याने जवळच्या लोकांनी घटनास्थळाकडे जाऊन गाडीतून अडकलेल्या लोकांना बाहेर काढले आणि जखमींना

रुग्णालयात पाठवले. अपघातात गाडीचा पूर्णपणे चेंदामेंदा झाल्याने अपघाताची भीषणता लक्षात येते. घटनेची माहिती मिळताच शहरातून नातेवाईकांनी घटनास्थळावर धाव घेतली. सकाळी

त्यांचे मृतदेह घरी आणण्यात आले असल्याने नातेवाईकांनी सांगितले.

ताज्या बातम्या

नगर ब्रेकिंग: टेम्पो पलटी होऊन मोठा अपघात या अपघातात दोनजण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्याच्या संगमनेर तालुक्यातून जाणार्‍या पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील माहुली घाटात मक्याची कणसे घेऊन जाणारा टेम्पो पलटी होऊन अपघात झाला. या अपघातात दोनजण...

मोटारसायकल, स्कूटर चालकांनो सावधान!जाणून घ्या नवा नियम

माय महाराष्ट्र न्यूज:हेल्मेट घातले की आपण निर्धास्तपणे दुचाकी वाहन चालवू शकू आणि आपल्याला कोणत्याही नियमाची अडचण येणार नाही असे तुम्हाला वाटत असल्यास तुम्ही सावध होण्याची...

महिला अ‍ॅथलीटने लग्नापूर्वी शारीरिक संबंध ठेवण्याबाबत मोठे विधान

माय महाराष्ट्र न्यूज:अ‍ॅथलीट म्हटलं तर दररोजचा व्यायाम आलाच. फिट राहण्यासाठी रोज सकाळी पहाटेची झोप मोड करत व्यायाम करावाचं लागतो. तसेच सेक्स लाईफबाबतही अनेक खेळाडूंना कॉम्प्रॉमाईस...

नगर जिल्ह्याच्या शेजारील जिल्ह्यातील घटना:मुलाने आईला प्रियकरासोबत बघितले आक्षेपार्ह अवस्थेत मग काय घडले नको ते

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा औरंगाबाद जिल्ह्यातून एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.आईच्या अनैतिक संबंधामुळे...

बँकेच्या नियमात मोठा बदल, व्यवहारासाठी आता या गोष्टी आवश्यक

माय महाराष्ट्र न्यूज:केंद्र सरकार लोकांच्या सुविधा आणि सुरक्षितता लक्षात घेऊन आवश्यक ती पावले उचलत आहे. गेल्या काही वर्षांपासून देशात डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी मोदी...

ATM मधून कॅश काढण्याच्या नियमात बदल, अन्यथा

माय महाराष्ट्र न्यूज:बँकिंग व्यवहारात एटीएममधून पैसे काढणं हा प्रत्येकाच्या गरजेचा भाग बनला आहे. पण अनेकदा एटीएम कार्डमधील माहितीचा गैरवापर करून ग्राहकांच्या खात्यातून परस्पर पैसे...
error: Content is protected !!