Friday, May 20, 2022

इंदुरीकर पुन्हा अडचणीत, आता दिव्यांगांसंबंधीचे वक्तव्य भोवणार?

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

 

 

माय महाराष्ट्र न्यूज:आपल्या कीर्तनातून बेधडक वक्तव्य करून अनेकदा वाद ओढावून घेणारे अहमदनगर जिल्ह्यातील समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर पुन्हा अडचणीत

 

आले आहेत. सुमारे दोन महिन्यांपूर्वी अकोला जिल्ह्यातील एका कार्यक्रमात त्यांनी दिव्यांगांसंबंधी वक्तव्य केले होते. त्याप्रकरणी पुण्यात दिव्यांग कल्याण आयुक्तांकडे तक्रार दाखल झाली आहे.

 

त्यावरून आयुक्तांनी अकोल्याच्या पोलिस अधिकाऱ्यांना चौकशी करून कारवाई करण्याच्या सूचना केल्या आहेत.सुमारे दोन महिन्यांपूर्वी अकोला जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे

यांनी इंदुरीकर यांचे कीर्तन आयोजित केले होते. या कार्यक्रमात इंदुरीकर यांनी त्यांच्या कीर्तनाचे व्हिडिओ यू ट्यूबवर अपलोड करणाऱ्यांवर टीका केली होती. ते म्हणाले होते, ‘माझ्या

 

किर्तनाच्या क्लिप बनवून चार हजार युट्यूबवाले कोट्याधीश झाले. मलाच कोर्टात खेचले. त्यांचे वाटोळच होणार. माझ्या भाषणाचे व्हिडिओ अपलोड करून पैसे कमावणाऱ्यांची मुले दिव्यांग जन्माला येतील.’ असे इंदुरीकर म्हणाले होते.

 

त्यांच्या या वक्तव्यासंबंधी पुण्यातील राजेंद्र वाकचौरे व दत्तात्रय भोसले यांनी दिव्यांग कल्याण आयुक्तांकडे तक्रार केली आहे. दिव्यांग व्यक्ती हक्क कायद्यानुसार हा गुन्हा आहे, त्यामुळे इंदुरीकर

यांच्यावर कारवाई व्हावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. याची दिव्यांग कल्याण आयुक्त ओमप्रकाश देशमुख यांनी दखल घेतली आहे. त्यांनी अकोल्याच्या पोलिस अधीक्षकांना पत्र पाठविले आहे.

 

इंदुरीकर यांच्या किर्तनाची तेथे चौकशी करावी. तक्रारीत तथ्य आढळल्यास दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ मधील कलम ९२ (अ) नुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, असे दिव्यांग आयुक्तांनी पत्रात म्हटले आहे.

 

त्यामुळे आता इंदुरीकर महाराज यांना पुन्हा एका नव्या चौकशीला सामोरे जावे लागणार आहे. यापूर्वी महिलांसंबंधीच्या त्यांच्या वक्त्यावरून वाद झाले होते. त्यानंतर

अपत्यप्राप्तीसंबंधी त्यांनी केलेल्या दाव्याला अंधश्रद्धा निर्मूलन समितीने हरकत घेतली. त्यावरून दाखल करण्यात आलेला खटला अद्याप उच्च न्यायालयात प्रलंबित आहे.

ताज्या बातम्या

नगर ब्रेकिंग: टेम्पो पलटी होऊन मोठा अपघात या अपघातात दोनजण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्याच्या संगमनेर तालुक्यातून जाणार्‍या पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील माहुली घाटात मक्याची कणसे घेऊन जाणारा टेम्पो पलटी होऊन अपघात झाला. या अपघातात दोनजण...

मोटारसायकल, स्कूटर चालकांनो सावधान!जाणून घ्या नवा नियम

माय महाराष्ट्र न्यूज:हेल्मेट घातले की आपण निर्धास्तपणे दुचाकी वाहन चालवू शकू आणि आपल्याला कोणत्याही नियमाची अडचण येणार नाही असे तुम्हाला वाटत असल्यास तुम्ही सावध होण्याची...

महिला अ‍ॅथलीटने लग्नापूर्वी शारीरिक संबंध ठेवण्याबाबत मोठे विधान

माय महाराष्ट्र न्यूज:अ‍ॅथलीट म्हटलं तर दररोजचा व्यायाम आलाच. फिट राहण्यासाठी रोज सकाळी पहाटेची झोप मोड करत व्यायाम करावाचं लागतो. तसेच सेक्स लाईफबाबतही अनेक खेळाडूंना कॉम्प्रॉमाईस...

नगर जिल्ह्याच्या शेजारील जिल्ह्यातील घटना:मुलाने आईला प्रियकरासोबत बघितले आक्षेपार्ह अवस्थेत मग काय घडले नको ते

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा औरंगाबाद जिल्ह्यातून एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.आईच्या अनैतिक संबंधामुळे...

बँकेच्या नियमात मोठा बदल, व्यवहारासाठी आता या गोष्टी आवश्यक

माय महाराष्ट्र न्यूज:केंद्र सरकार लोकांच्या सुविधा आणि सुरक्षितता लक्षात घेऊन आवश्यक ती पावले उचलत आहे. गेल्या काही वर्षांपासून देशात डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी मोदी...

ATM मधून कॅश काढण्याच्या नियमात बदल, अन्यथा

माय महाराष्ट्र न्यूज:बँकिंग व्यवहारात एटीएममधून पैसे काढणं हा प्रत्येकाच्या गरजेचा भाग बनला आहे. पण अनेकदा एटीएम कार्डमधील माहितीचा गैरवापर करून ग्राहकांच्या खात्यातून परस्पर पैसे...
error: Content is protected !!