माय महाराष्ट्र न्यूज:संभाजीराजे यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत संभाजीराजे काय भूमिका मांडतात? काय घोषणा करतात याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या.
अखेर पत्रकार परिषदेतून संभाजीराजे यांनी दोन मोठ्या घोषणा केल्या आहेत.संभाजीराजे म्हणाले, दोन निर्णय मी घेतले आहेत. त्यापैकी पहिला निर्णय राज्यसभ्येच्या संदर्भातील आहे.
राज्यसभेचं समीकरण पाहिलं तर जुलैमध्ये 6 जागा रिक्त होत आहेत. यापूर्वी 3 जागा भाजप 1 जागा राष्ट्रवादी,1 सेना ,1 काँग्रेस अशी होती. आता समीकरण बदललं भाजपला दोन, काँग्रेसला
1, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस 1 जागा, उरलेली 1 जागा आहे.मी निवडणूक लढवणार आहे. अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आहे. 42 मताचा कोशंत पूर्ण करावा लागेल, 28 मत शिल्लक आहेत .
आता राजकीय पक्षांनी ठरवावं. अपक्ष म्हणून सर्वांनी पाठिंबा द्यावा. जे छोटे मोठे पक्ष आहेत ज्यांना व्हीप नाही त्यांनी जाहीर भूमिका घेत मला समर्थन द्यावं. आपण मला राज्यसभेत पाठवावं
म्हणून मी सर्वपक्षांना विनंती करु इच्छितो. मी स्पष्टपणे सांगतो की, मी कुठल्याही पक्षात जाणार नाही. मी आजपासून कुठल्याही पक्षाचा सदस्य नाही.दुसरी घोषणा अशी की, स्वराज्य
नावाची संघटना आपण स्थापन करत आहोत. शिवाजी महाराज, शाहू महाराजांवर प्रेम करणाऱ्यांना एका छता खाली आणायचा प्रयत्न आहे, समाजाला नवी दिशा देण्यासाठी, अन्याय होत असेल
तिथे अन्यायाच्या विरोधात लढा देण्यासाठी, शिवाजी महाराज, शाहु महाराजांचे नाव जगभरात पोहोचवण्यासाठी स्वराज्य नावाच्या संघटनेची स्थापना करत आहोत असं संभाजीराजेंनी म्हटलं
स्वराज्य संघटनेचा प्रसार होण्यासाठी, स्वराज्य संघटीत करण्यासाठी मी लवकरच.. या महिन्यातच महाराष्ट्राचा दौरा करणार, लोकांच्या भावना समजून घेण्यासाठी, लोकांना विश्वासात
घेण्यासाठी आणि लोकांना स्वराज्यच्या नावाखाली संघटीत करण्यासाठी स्वराज्य संघटनेची स्थापना झाल्याचं मी जाहीर करतो.