Tuesday, May 17, 2022

इंदुरीकर महाराजांवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता ?

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:प्रसिद्ध किर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकरांविरोधात गुन्हा दाखल होण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. अकोला येथील एका किर्तनादरम्यान युट्यूबर्ससंदर्भात केलेलं

वक्तव्यावरुन इंदुरीकर महाराज अडचणीत येण्याची शक्यता आहे. अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या कार्यकर्ता रंजना गवांदे यांनी इंदुरीकर महाराजांविरोधात पुण्यातील दिव्यांग कल्याण आयुक्तांकडे

तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर इंदुरीकरांनी केलेल्या वक्तव्याची चौकशी करुन तथ्य अढळल्यास गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती प्रसारमाध्यमांशी बोलताना दिलीय.

अकोल्यामध्ये त्यांनी एक वक्तव्य केलं. त्यांनी माझे युट्यूब अपलोड केले असे चार हजार लोक कोट्याधीश झाले. त्यांनीच मला कोर्टात खेचलं. त्यांचं वाटोळं होईल आणि त्यांच्या पोटी

जन्माला येणारी मुलं दिव्यांग असतील, अशाप्रकारचं वक्तव्य केलंय,” असं गवांदे यांनी म्हटलंय. तसेच पुढे बोलताना, हे आक्षेपार्ह वक्तव्य आहे. या वक्तव्याविरोधात पुण्यात दोन लोकांनी तक्रार केलीय.

दिव्यांग कल्याण आयुक्तांकडे इंदुरीकरांविरोधात गुन्हा दाखल व्हावा अशी तक्रार केलीय असंही गवांदे म्हणाल्या आहेत.या तक्रारनुसार पुण्यातील दिव्यांग कल्याण आयुक्तांनी अकोल्याच्या

पोलीस अधिक्षकांना पत्र लिहिलं आहे. या गुन्ह्याची चौकशी करुन यात तथ्य असेल तर गुन्हा दाखल करावा अशाप्रकारचे आदेश दिलेत. हे जे निवृत्ती इंदुरीकर ज्यांना निवृत्ती महाराज संबोधलं जातं यांनी

यांच्यापूर्वीही अशी आक्षेपार्ह वक्तव्य केली आहेत,” असंही गवांदे म्हणाल्यात. “यापूर्वी एका प्रकरणात पीसीपीएडीटी अॅक्टअंतर्गत जे वक्तव्य केलंय त्यासंदर्भात महाराष्ट्र अंनिसने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केलाय.

अद्याप ते प्रकरण औरंगाबाद उच्च न्यायालयामध्ये प्रलंबित आहे,” अशी माहिती गवांदे यांनी दिली.करोनाच्या काळात सरकार एकीकडे सांगत होते लस घ्या. त्यावेळेस इंदूरीकर महाराज

शासनाच्याविरोधात वक्तव्य करत होते. मी लस घेतली नाही, घेणार नाही आणि मला करोना झाला नाही. तो त्यावेळेस आपत्तीसंदर्भातील कायदा होता त्याविरोधात त्यांनी वक्तव्य केलं अशी

आठवण गवांदे यांनी करुन दिलीय. तसेच सध्याच्या प्रकरणाबद्दल बोताना, “आता सुद्धा दिव्यांगांबद्दलचं जे वक्तव्य केलंय ते भावना दुखावणारं आणि समाजात अंधश्रद्धा पसरवणारं वक्तव्य आहे.

असं गवांदे म्हणाल्या.म्हणजे मी शाप दिला तर असं घडेल अशाप्रकारचं त्यांचं हे वक्तव्य आहे. या वक्तव्याच्या संबंधाने चौकशी होऊन त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल व्हावा अशी आमची मागणी आहे असं गवांदेंनी म्हटलंय.

ताज्या बातम्या

महाराष्ट्रातील मोठी बातमी! महाराष्ट्रातील निवडणुकांबाबत सुप्रिम कोर्टाचा मोठा आदेश

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी घ्यायच्या याबाबत सुप्रिम कोर्टात सुनावणी सुरु आहे. जिथे पावसाळा आहे तिथे मान्सून नंतर निवडणूका घ्या असा...

ऑनलाइन क्लास सुरू असताना प्राध्यापिकेच्या मोबाइलवर आला अश्लील व्हिडिओ

माय महाराष्ट्र न्यूज:ऑनलाईन क्लास सुरू असतानाच विद्यार्थिनींसह प्राध्यापिकेच्या स्मार्टफोनवर अश्लील मेसेज आणि व्हिडिओ आल्याचा धक्कादायक प्रकार नांदेड शहरात उघडकीस आला. विष्णुपुरी ग्रामीण तंत्रनिकेतन महाविद्यालयात हा...

या गोष्टींमुळे महिला पुरुषांकडे आकर्षित होतात

माय महाराष्ट्र न्यूज:काही वेळा पुरूष सहज काहीतरी वागून किंवा बोलून जातात. मात्र त्यांच्या छोट्या-छोट्या गोष्टी महिलांवर छाप सोडतात. जाणीवपूर्वक प्रयत्न करणाऱ्या नाही तर महिलांच्या...

या पठ्ठ्याने म्हणून दोनशे क्विंटल कांदा मोफत वाटला

माय महाराष्ट्र न्यूज:वर्षभर कष्ट करुन कधी आस्मानी तर कधी सुलतानी संकटाचा सामना शेतकऱ्याला करावा लागतो. अनेक अडचणींवर मात करत उभं केलेलं पिक अनेकदा आस्मानी...

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात खळबळजनक बातमी : काँग्रेस महाविकास आघाडीतून बाहेर पडणार?

माय महाराष्ट्र न्यूज:गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीतील अंतर्गत धुसपूस वाढत चालल्याचे पाहायला मिळत आहे. अनेकविध मुद्द्यांमुळे महाविकास आघाडीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येऊ लागला आहे. स्थानिक...

महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांना मेघगर्जनेसह पावसाचा इशारा…

माय महाराष्ट्र न्यूज:उत्तर भारतात तापमानाचा पारा वाढत असताना आता दक्षिण भारतात नैऋत्य मोसमी वाऱ्यांचं आगमग होत आहे.अंदमाननंतर आता नैऋत्य मोसमी वारे बंगालच्या उपसागरापर्यंत पोहोचले...
error: Content is protected !!