Tuesday, May 24, 2022

मान्सून वेळेआधी दाखल होणार, हवामान खात्याचा अंदाज

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज : यंदा मान्सून वेळेअगोदरच येण्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. प्रत्येकवर्षी अंदमानमध्ये पाऊस २२ मेपर्यंत दाखल असतो. मात्र, यावर्षी पाऊस

१३ ते १९ मे दरम्यान म्हणजे वेळेअगोदरच दाखल होण्याची शक्यता असल्याचे हवामान खात्याने वर्तविले आहे. यानंतर २० ते २६ मेपर्यंत पाऊस केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे.

तर तळकोकणामध्ये २७ मे ते २ जूनपर्यंत दाखल होण्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे.भारतीय हवामान खात्याने पुढील ४ आठवड्यांच्या हवामानाचा

अंदाज वर्तविला आहे. पाऊस सुरु होण्याची तारीख हवामान खात्याकडून १५ मे रोजी जाहीर करण्यात येणार आहे. अंदमानच्या समुद्रावर १३ ते १९ मे दरम्यान मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे.

दरवर्षी अंदबारमध्ये मान्सून २२ मेपर्यंत दाखल होत असतो. मात्र यंदा मान्सून वेळेच्या अगोदरच दाखल होणार आहे.पुणे हवामान खात्याचे प्रमुखे कृष्णानंद होसाळीकर यांनी ट्विट करत पावसाची

माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले आहे की, पुढील महिन्यातील पहिल्या आठवड्यात अंदमानानवर मान्सून दाखल होणार आहे. यानंतर दुसऱ्या आठवड्यात अरबी समुद्रावर पाऊस शक्यता

आहे, आणि त्यानंतर पुढील आठवड्यात भारतात मान्सून दाखल होणार आहे.भारतीय हवामानशास्त्र खात्याच्या माहितीनुसार, असनी चक्रीवादळाचा मार्ग बदलला आहे, बंगालच्या

उपसागरावर ‘असनी’ चक्रीवादळाचा प्रभाव आंध्र प्रदेश, ओडिशा, तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि जवळील राज्यात दिसायला सुरुवात झाली आहे, हवामान खात्यानुसार या ठिकाणी

जोरदार वाऱ्याबरोबरच पाऊस पडणार आहे. सध्या वादळामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अनेक विमानांची उड्डाणे देखील रद्द करण्यात आली आहेत.

ताज्या बातम्या

SBI च्या ग्राहकांनो सावधान

    माय महाराष्ट्र न्यूज:भारत सरकारच्या केंद्रीय संस्था प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांना महत्वाचे आवाहन केले आहे.   एसबीआयच्या ग्राहकांनी त्यांच्या खात्यांमध्ये प्रवेश करण्यासाठी...

नगर ब्रेकिंग:कारच्या अपघातात पिता-पुत्राचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज:अज्ञात वाहन व कारच्या अपघातात कारमधील पिता-पुत्राचा मृत्यू झाला. बाजीराव त्रिंबक मिसकर (वय 40) व ओम बाजीराव मिसकर (वय 13, दोघे रा. जळगाव...

महाराष्ट्रातील खळबळजनक बातमी:३ वर्षांच्या मुलीला रक्तपेढीतील रक्तातून HIVचा संसर्ग

माय महाराष्ट्र न्यूज:नागपुरात तीन वर्षांच्या मुलीला रक्तपेढीतून मिळालेल्या रक्तातून एचआयव्हीचा संसर्ग झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घडलेल्या धक्कादायक प्रकारामुळं नागपुरात खळबळ उडाली...

नगर जिल्ह्यात आजोबांप्रमाणेच सुजय विखेंचा ‘नव्या प्रयोगा’चा मनसुबा

माय महाराष्ट्र न्यूज:काँग्रेसमधील एकेकाळचे दिग्गज नेते दिवंगत बाळासाहेब विखे यांनी १९९१ मध्ये जेव्हा प्रथम पक्ष सोडला, त्यावेळी नगर जिल्ह्यात आपल्या गटाचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण...

राज्यातील ओबीसींचे हक्काचे आरक्षण मिळाल्या शिवाय निवडणुका घेऊ नये-मुरकुटे

नेवासा राज्यातील ओबीसींचे हक्काचे आरक्षण मिळाल्या शिवाय निवडणुका घेऊ नये अशी मागणी माजी आ.बाळासाहेब मुरकुटे यांनी केली. नेवासा तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज तहसीलदार रुपेशकुमार...

नगर ब्रेकिंग: संतापजनक:विवाहितेवर सासरच्या दारातच अंत्यसंस्कार

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील निळवंडे येथे शेततळ्यातील पाण्यात विवाहित महिलेचा मृतदेह तरंगताना आढळून आला. शीतल सतिष केरे असे मयत विवाहितेचे नाव...
error: Content is protected !!