माय महाराष्ट्र न्यूज:बाराबंकी जिल्ह्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे एका महिला कॉन्स्टेबलने पोलीस कर्मचाऱ्यावर
लग्नाच्या बहाण्याने शारीरिक संबंध आणि बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. इतकंच नाही तर, तर बहिणीचे लग्न लावून देण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्याने आपल्याकडून 4 लाख रुपये उकळल्याचा
आरोपही महिला कॉन्स्टेबलने केला आहे. जेव्हा महिलेने या पोलीस कर्मचाऱ्याकडे लग्नाचा तगादा लावला तेव्हा त्याने पीडितेला मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली. दरम्यान, महिला
कॉन्स्टेबलच्या तक्रारीनंतर पोलीस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सचिन कुमार असे आरोपी पोलीस कर्मचाऱ्याचं नाव असून तो बाबुपूर चांदपूर येथील रहिवासी आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला 2019 पासून कोठी पोलीस ठाण्यात तैनात होती. त्याचवेळी पीडितेची भेट मुरादाबाद जिल्ह्यातील भगतपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या बाबुपूर
चांदपूर येथील रहिवासी सचिन कुमार याच्याशी झाली. महिला कॉन्स्टेबलने दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी सचिन याने प्रथम तिच्यासोबत मैत्री केली. त्यानंतर लग्नाचे अमिष दाखवत तिच्याशी
सतत लैंगिक संबंध ठेवले होते. यादरम्यान, बहिणीच्या लग्नाचे कारण सांगत आरोपीने पीडितेकडून 4 लाख रुपये सुद्धा उकळले.पीडितेचे म्हणणे आहे की, केवळ सचिनच नाही तर त्याच्या
संपूर्ण कुटुंबाला या नात्याची माहिती होती. दोघांमध्ये लग्नाचीही चर्चा होती. मात्र, काही दिवसानंतर आरोपी सचिनने पीडितेसोबत लग्न करण्यास टाळाटाळ केली. यावर पीडितेने
जाब विचारला असता आरोपीने तिला मारहाणही केली. आपल्यासोबत घडलेल्या प्रकारानंतर पीडित महिलेने पोलिसांत धाव घेतली. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी सचिन
विरोधात बलात्कारासह एससी-एसटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल केल्यानंतर पोलीस संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.