माय महाराष्ट्र न्यूज:लग्नाच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये पती-पत्नीला जुळवून घ्यावे लागते. जेव्हा ते एकमेकांना समजून घेण्याच्या टप्प्यात असतात तेव्हा त्यांच्या नात्यात अनेक चढ-उतार येतात.
कधीकधी तुमच्या जोडीदाराला आवडत नसलेली गोष्ट बोलल्यामुळे अर्धी समस्या येते. नातेसंबंध मजबूत करण्यासाठी आणि कोणत्याही प्रकारचा त्रास टाळण्यासाठी खासकरून महिलावर्गाने आपल्या पतींसमोर विचारपूर्वक बोलले पाहिजे.
पतीशी बोलताना काही गोष्टींची विशेष काळजी घ्यावी. चला जाणून घेऊया त्या पाच गोष्टींबद्दल ज्या पत्नीने पतीसमोर अजिबात करू नयेत.लग्नानंतर स्त्रिया अनेकदा पती किंवा सासरच्या मंडळींसमोर आपल्या माहेरच्यांची प्रशंसा करतात. हे जास्त करणे टाळा.
नातलगांच्या अवाजवी स्तुतीमुळे तुमच्या पतीला असे वाटू शकते की तुम्ही तुमच्या कुटुंबाची त्यांच्या कुटुंबाशी तुलना करत आहात. पतीला असेही वाटू शकते की आपण पत्नीला आनंदी ठेवू शकत नाही आणि म्हणूनच ती अनेकदा आपल्या माहेरच्या व्यक्तींची प्रशंसा करते.
हे कोणत्याही नवऱ्याला आवडू शकत नाही.आपल्या पत्नीने आपल्या कुटुंबातील व्यक्तींना आपले मानले पाहिजे असे जवळजवळ प्रत्येक पुरुषाला वाटते. अशा स्थितीत जर तुम्ही तुमच्या नवऱ्यासमोर तुमच्या सासू, सासरे, दीर किंवा नणंद यांच्याबद्दल वाईट बोललात
तर तुमच्या नवऱ्याला ते आवडणार नाही. कदाचित तो तुम्हाला काही बोलत नसेल पण नवर्याकडे पुन्हा पुन्हा सासरच्यांबद्दल गॉसिप करणं काही चांगलं नाही. यामुळे नात्याबाबत पतीच्या मनात कटुता येऊ शकते.
पतीला पत्नीची तुलना इतर कोणाशी करणे कधीही आवडत नाही. विशेषतः जर तुम्ही तुमच्या पतीची तुलना इतर पुरुषांशी केली तर त्याला वाईट वाटेल. यामुळे तो तुमच्यावर रागावू शकतो किंवा तुमच्यात वादही होऊ शकतात.
प्रत्येक पुरुषाला आपल्या पत्नीकडून पूर्ण महत्त्व हवे असते. त्यामुळे कोणत्याही कार्यक्रमात किंवा संमेलनात पतीला विसरू नका. त्यांना महत्त्व आणि वेळ द्या. मित्र किंवा नातेवाईकांमध्ये इतके व्यस्त राहू नका की तुम्ही तुमच्या पतीसोबत वेळ
घालवायला विसराल. पतीला विशेषतः त्याच्या नातलगांसमोर आणि मित्रांसमोर तुमचे लक्ष हवे असते. जर तुम्ही असे केले नाही तर त्यांना वाईट वाटू शकते आणि नात्यात अंतर निर्माण होऊ शकते.