Friday, May 20, 2022

पुन्हा वाढणार पेट्रोल-डिझेल दर? जाणून घ्या कारण

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:ग्लोबल मार्केटमध्ये कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींदरम्यान सरकारी तेल कंपन्यांनी शुक्रवारी सकाळी पेट्रोल-डिझेलचे नवे

रेट जारी केले आहेत. आज इंधन दरात बदल करण्यात आलेला नाही. परंतु क्रूड ऑइलच्या वाढत्या किमतींच्या कारणामुळे कंपन्यांवर पुन्हा दबाव वाढू शकतो.

जाणकारांनी आधीच किमती वाढू शकतात याचा अंदाज वर्तवला आहे. ब्रेंट क्रूडचा भाव 110 डॉलरच्या वर गेल्यास पेट्रोल-डिझेलचे दर पुन्हा वाढण्यास सुरू होऊ शकतात. तेल कंपन्यांनी

6 एप्रिल रोजी पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ केली होती. त्यादरम्यान केवळ 15 दिवसांत तब्बल 14 वेळा इंधन दर वाढवण्यात आला होता. या 14 दिवसांत एकूण 10.20 रुपये प्रति लीटरची वाढ झाली होती.

त्यानंतर दिल्लीत पेट्रोल 105 तर मुंबईत 120 रुपये प्रति लीटर आहे. क्रूड दर 110 डॉलरच्या खाली असल्याने भारतात इंधन दरात कोणतीही वाढ केली नसल्याचं कंपन्यांचं म्हणणं आहे.

दिल्लीत पेट्रोल 105.41 रुपये आणि डिझेल 96.67 रुपये प्रति लीटर तर मुंबईत पेट्रोल 120.51 रुपये आणि डिझेल 104.77 रुपये प्रति लीटर.

देशातील तीन ऑईल मार्केटिंग कंपन्या HPCL, BPCL आणि IOCL रोज सकाळी 6 वाजता पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर करतात. पेट्रोल-डिझेल दरात एक्साइज ड्यूटी, डिलर कमीशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर याचा किंमत दुप्पट होते.

पेट्रोल-डिझेल दर तुम्ही SMS द्वारेही जाणून घेऊ शकता. तुम्ही 92249 92249 वर SMS पाठवून आपण पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल देखील जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलच्या

वेबसाइटनुसार आपल्याला RSP<स्पेस> शहराचा कोड लिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा एक वेगळा कोड असतो. IOCL च्या वेबसाइटवर तुम्हाला हा कोड मिळेल

ताज्या बातम्या

महिला अ‍ॅथलीटने लग्नापूर्वी शारीरिक संबंध ठेवण्याबाबत मोठे विधान

माय महाराष्ट्र न्यूज:अ‍ॅथलीट म्हटलं तर दररोजचा व्यायाम आलाच. फिट राहण्यासाठी रोज सकाळी पहाटेची झोप मोड करत व्यायाम करावाचं लागतो. तसेच सेक्स लाईफबाबतही अनेक खेळाडूंना कॉम्प्रॉमाईस...

नगर जिल्ह्याच्या शेजारील जिल्ह्यातील घटना:मुलाने आईला प्रियकरासोबत बघितले आक्षेपार्ह अवस्थेत मग काय घडले नको ते

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा औरंगाबाद जिल्ह्यातून एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.आईच्या अनैतिक संबंधामुळे...

बँकेच्या नियमात मोठा बदल, व्यवहारासाठी आता या गोष्टी आवश्यक

माय महाराष्ट्र न्यूज:केंद्र सरकार लोकांच्या सुविधा आणि सुरक्षितता लक्षात घेऊन आवश्यक ती पावले उचलत आहे. गेल्या काही वर्षांपासून देशात डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी मोदी...

ATM मधून कॅश काढण्याच्या नियमात बदल, अन्यथा

माय महाराष्ट्र न्यूज:बँकिंग व्यवहारात एटीएममधून पैसे काढणं हा प्रत्येकाच्या गरजेचा भाग बनला आहे. पण अनेकदा एटीएम कार्डमधील माहितीचा गैरवापर करून ग्राहकांच्या खात्यातून परस्पर पैसे...

हेल्मेट घातलं असेल तरी भरावा लागणार दंड

माय महाराष्ट्र न्यूज:हेल्मेट न घालता दुचाकी चालवल्याबद्दल तुम्ही ऐकलं असेलच. पण आता हेल्मेट घातलं असेल तरी चालान कापलं जाऊ शकतं. हे चलनही थोडं-थोडकं नसून...

नगर ब्रेकिंग:सोशल मीडियावर बनावट अकाऊंट: अश्लील मेसेज पाठवून महिलांची बदनामी

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातून एक खळबळजनक आणि चीड आणणारी बातमी समोर आली आहे.इंस्टाग्राम आणि शेअर चॅटवर बनावट अकाऊंट तयार करून तसेच अश्लील मेसेज...
error: Content is protected !!