Monday, May 23, 2022

महाराष्ट्रात आज कसं असेल हवामान?

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:देशाची राजधानी दिल्लीसह उत्तर-मध्य भारतातील इतर राज्यांमध्ये सध्या उष्णतेच्या प्रकोपापासून दिलासा

मिळण्याची चिन्हं नाहीत. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या म्हणण्यानुसार, उत्तर-पश्चिम आणि मध्य भारतात पुढील ५ दिवस तीव्र उष्णता राहील. उत्तर-मध्य भारतात सरासरी कमाल

तापमान ४३ ते ४५ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रालाही उकाड्यापासून दिलासा मिळण्याची चिन्हं नसल्याचं स्कायमेटच्या अहवालातून समोर आलं आहे.

हरियाणा, राजस्थानसह अनेक राज्यांमध्ये तीव्र उन्हाला सुरू आहे. यूपी, बिहार, झारखंड, छत्तीसगडमध्ये तापमानात घट नोंदवण्यात आली आहे. ओडिशा, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश इत्यादी

अनेक राज्ये आहेत, जिथे आसनी चक्रीवादळामुळे मुसळधार पाऊस पडेल. स्कायमेट वेदरनुसार, शुक्रवारी गुजरात आणि राजस्थान, विदर्भ, मराठवाडा, उत्तर मध्य महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि दक्षिण

हरियाणाच्या अनेक भागांमध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.मागच्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात सकाळच्या वेळेत तीव्र उष्णता जाणवत होती. ढगाळ

वातावरण असल्याने उष्णतेच्या प्रमाणातही वाढ झाली आहे. दरम्यान मागच्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असुनही कोणत्याही जिल्ह्यात अद्याप पाऊस झाला नाही. मात्र हवामान

खात्याच्या अधिकाऱ्यांनी पुढच्या 3 आठवड्यात महाराष्ट्रात पावसाची शक्यता असल्याचं सांगितलं आहे. मान्सून वेळेआधीच दाखल होण्याची शक्यता आहे.

13 ते 19 मे दरम्यान मान्सूनला सुरुवात होणार असल्याचं हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे.

ताज्या बातम्या

नगर ब्रेकिंग: संतापजनक:विवाहितेवर सासरच्या दारातच अंत्यसंस्कार

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील निळवंडे येथे शेततळ्यातील पाण्यात विवाहित महिलेचा मृतदेह तरंगताना आढळून आला. शीतल सतिष केरे असे मयत विवाहितेचे नाव...

चाणक्याच्या ‘या’ गोष्टींनी करा दिवसाची सुरुवात, तुम्ही कधीही नाही होणार अपयशी

माय महाराष्ट्र न्यूज:चाणक्य नीतीनुसार कोणतेही काम करताना त्याच्या सुरुवातीकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. कारण जेव्हा एखाद्या गोष्टीची सुरुवात चांगली होते तेव्हा तिचा शेवटही चांगला...

नवरा-बायकोमध्ये सतत वाद होतायत, हे उपाय केल्यास वाढेल प्रेम

माय महाराष्ट्र न्यूज: व्यस्त जीवनशैलीमुळे नवरा-बायको एकमेकांसोबत जास्त वेळ घालवू शकत नाहीत. वेळेची कमतरता आणि अनेक कारणामुळे अनेकदा नात्यामध्ये गैरसमज निर्माण होतात. अशातच या...

जे नको व्हायला हवे तेच घडले;ओमायक्रॉनचा तो प्रकार भारतात आढळला

माय महाराष्ट्र न्यूज:ऑनलाईन ओमायक्रॉनचा नवा उपप्रकार BA.5 ची नोंद तेलंगणामध्ये झालेली आहे. पूर्ण लसीकरण झालेल्या ८० वर्षं वयाच्या एका वृद्धात कोव्हीड विषाणूचा हा नवा...

नगर जिल्ह्यातील या भाजपाच्या नेत्यांचा निशाणा : शरद पवार यांची ही जुनीच नीती

माय महाराष्ट्र न्यूज:राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ब्राह्मण समाजाच्या बोलावलेल्या बैठकीवर भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'जो बूॅंदसे गई...

नगर जिल्ह्यात खरिपासाठी पहिल्या टप्प्यात फक्त इतके बियाणे उपलब्ध

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात खरीप हंगामाची जय्यत तयारी सुरू असून १७ प्रमुख पिकांसह इतर पिकांच्या बियाणांचे नियोजन आखण्यात आले आहे. जिल्ह्यासाठी सुमारे ७० हजार २१...
error: Content is protected !!