Monday, May 23, 2022

नगर ब्रेकिंग:बेपत्ता तरुणीचा मृतदेह तिसर्‍या दिवशी विहिरीत आढळला; नातेवाईकांनी केला हा आरोप 

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील भोकर येथील तीन दिवसांपूर्वी गायब झालेली तरूणी तिसर्‍या दिवशी

त्यांच्याच शेतातील विहीरीत मृतावस्थेत आढळून आली. तिचा मृतदेह काल गुरुवारी सायंकाळी विहिरीतून काढून शवविच्छेदनासाठी रवाना करण्यात आला आहे.

या तरुणीचा घातपात झाला असल्याचा संशय तिच्या नातेवाईकांनी व्यक्त केला आहे.भोकर शिवारातील शेतकरी कुटूंबातील राजेंद्र रघुनाथ वाकडे हे खोकर- भोकर शिवरस्त्यालगत

असलेल्या चव्हाण यांच्या शेडमध्ये राहतात. त्यांची थोरली मुलगी दिपाली राजेंद्र वाकडे ही 18 वर्षांची तरुणी मंगळवार दि.10 मेच्या सायंकाळी सात वाजेच्या सुमारास राहत्या घरातून गायब झाली.

वाकडे कुटुंबाने मंगळवार रात्रीपासून दीपालीचा परीसरात शोध घेतला परंतु काहीही हाती न लागल्याने अखेर दुसर्‍या दिवशी म्हणजे बुधवार दि.11 मेच्या रात्री दीपालीचे वडील राजेंद्र यांनी दीपाली बेपत्ता झाल्याची नोंद तालुका पोलिसांत दाखल केली.

पोलिसांनी बेपत्ताची नोंद घेवून शोध सुरू केला त्याच बरेाबर नातेवाईकही पुन्हा शोध घेतच होते. काल सायंकळी सहा वाजेच्या सुमारास दीपालीचे वडील राजेंद्र हे आपल्या गट नं.200 मधील

शेतातील विहिरीची पाण्याची पातळी बघून वीजपंप बंद करण्यासाठी गेले असता विहिरीत डोकावले असता त्यांना दीपालीचा मृतदेह आढळला.

काल रात्री उशीराने मयत दिपालीचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढून शवविच्छेदनासाठी रवाना करण्यात आला. वैद्यकीय अहवालानंतर चित्र स्पष्ट होईल असे पोलीस उपनिरीक्षक अतुल बोरसे यांनी सांगितले.

याप्रकरणी साखर कामगार हॉस्पिटलचे वैद्यकीय अधिकारी यांचे अहवालानुसार सदर तरुणीचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचा प्राथमिक अहवालानुसार अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात

आली असून पुढील तपास पो. नि. मच्छिंद्र खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अतुल बोरसे करत आहेत.

ताज्या बातम्या

राज्यातील ओबीसींचे हक्काचे आरक्षण मिळाल्या शिवाय निवडणुका घेऊ नये-मुरकुटे

नेवासा राज्यातील ओबीसींचे हक्काचे आरक्षण मिळाल्या शिवाय निवडणुका घेऊ नये अशी मागणी माजी आ.बाळासाहेब मुरकुटे यांनी केली. नेवासा तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज तहसीलदार रुपेशकुमार...

नगर ब्रेकिंग: संतापजनक:विवाहितेवर सासरच्या दारातच अंत्यसंस्कार

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील निळवंडे येथे शेततळ्यातील पाण्यात विवाहित महिलेचा मृतदेह तरंगताना आढळून आला. शीतल सतिष केरे असे मयत विवाहितेचे नाव...

चाणक्याच्या ‘या’ गोष्टींनी करा दिवसाची सुरुवात, तुम्ही कधीही नाही होणार अपयशी

माय महाराष्ट्र न्यूज:चाणक्य नीतीनुसार कोणतेही काम करताना त्याच्या सुरुवातीकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. कारण जेव्हा एखाद्या गोष्टीची सुरुवात चांगली होते तेव्हा तिचा शेवटही चांगला...

नवरा-बायकोमध्ये सतत वाद होतायत, हे उपाय केल्यास वाढेल प्रेम

माय महाराष्ट्र न्यूज: व्यस्त जीवनशैलीमुळे नवरा-बायको एकमेकांसोबत जास्त वेळ घालवू शकत नाहीत. वेळेची कमतरता आणि अनेक कारणामुळे अनेकदा नात्यामध्ये गैरसमज निर्माण होतात. अशातच या...

जे नको व्हायला हवे तेच घडले;ओमायक्रॉनचा तो प्रकार भारतात आढळला

माय महाराष्ट्र न्यूज:ऑनलाईन ओमायक्रॉनचा नवा उपप्रकार BA.5 ची नोंद तेलंगणामध्ये झालेली आहे. पूर्ण लसीकरण झालेल्या ८० वर्षं वयाच्या एका वृद्धात कोव्हीड विषाणूचा हा नवा...

नगर जिल्ह्यातील या भाजपाच्या नेत्यांचा निशाणा : शरद पवार यांची ही जुनीच नीती

माय महाराष्ट्र न्यूज:राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ब्राह्मण समाजाच्या बोलावलेल्या बैठकीवर भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'जो बूॅंदसे गई...
error: Content is protected !!