Wednesday, May 25, 2022

कोरोना लस घेतलेल्यांसाठी महत्वाची बातमी

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोना व्हायरसपासून संरक्षणासाठी आपण ज्या कंपनीची लस घेतली असेल, बूस्‍टर डोसही आपल्याला त्याच

कंपनीचा घ्यावा लागू शकतो. कारण, सरकार अद्याप दोन वेगवेगळ्या लसींचे मिश्रण करण्यास मंजुरी देण्याच्या विचारात दिसत नाही. खरे तर, सरकार सीएमसी वेल्लोरच्या अध्ययनाच्या

आधारे, असा निर्णय घेऊ शकते. यामागचे महत्वाचे कारण म्हणजे, बूस्टर डोससाठी लसींचे मिश्रण करूनही निकालात एकसूत्रता दिसून आलेली नाही.गुरुवारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीला

कोव्हॅक्सीनचे डोस घेतल्यानंतर, कोविशिल्डचा बूस्टर डोस घेतल्यास, 6 ते 10 पट अँटीबॉडी वाढल्याचे दिसून आले आहे. असे ख्रिश्चन मेडिकल कॉलेज (CMC) वेल्लोरच्या अध्ययनाची समीक्षा

करणाऱ्या एनटीएजीआयच्या कोरोना कार्य समूहाने गेल्या आठवड्यातच म्हटले आहे. एका अधिकृत सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, कोविशील्‍डचे दोन डोस घेतल्यानंतर बूस्टर डोस म्हणून, कोव्हॅक्सीनचा

डोस दिला असता, असा रिझल्ट दिसून आला नाही. तसेच, या कार्यक्रमासंदर्भातील आव्हाने डोळ्यासमोर ठेवून, यासंदर्भात अंतिम शिफारशीसाठी NTAGI च्या स्थायी तांत्रिक उपसमितीच्या बैठकीत चर्चा केली केली जाईल, असेही सूत्रांनी म्हटले आहे.

सध्या देशात कोरोना लसींचे मिश्रण करण्याची परवानगी नाही. म्हणजेच, लोकांनी ज्या कोरोना लसीचे दोन डोस घेतले आहेत, त्यांना त्याच लसीचा बुस्टर डोस घ्यावा लागणार आहे. यातच

गेल्या चार मेरोजी बायोलॉजिकल ईने भारताच्या औषध नियंत्रकांकडे एक अर्ज करत, कोवीशिल्ड अथवा कोव्हॅक्सीनचे दोन्ही डोस घेतलेल्या लोकांसाठी, बुस्टर डोस म्हणून, आपल्या ‘

कोरबेव्हॅक्स’ लसीच्या आपतकालीन वापरास परवानगी देण्यात यावी, अशी मागणी केली आहे.

ताज्या बातम्या

मुळा-निळवंडे धरणाच्या कालव्यावरील एकूण १७ उपसा सिंचन योजनांचे सर्वेक्षणासाठी २ कोटी ३७ लाखांहून अधिक निधी-मंत्री शंकरराव गडाख

नेवासा/सुखदेव फुलारी नगर जिल्ह्यातील मुळा धरणाच्या जलाशय-नदीवरील आणि निळवंडे धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्यावरील एकूण १७ उपसा सिंचन योजनांचे प्राथमिक सर्वेक्षण करण्यात येणार असून यासाठी...

वर पक्षाकडून वधू कुटुंबीयांचा प्रत्येकी 10 लाख रुपयांचा विमा

भेंडा(नेवासा) नेवासा तालुक्यातील भेंडा येथील काळे परिवाराने विवाह सोहळ्यानिमित्त एक अनोखा उपक्रम राबविला.वरपक्षाने लग्नाच्या दिवशी वधूच्या कुटुंबातील 12 व्यक्तींची प्रत्येकी 10 लाखा रुपयांची विमा पॉलिसी...

साखर निर्यातीवर बंदी नसल्याचा विस्माचा खुलासा

नेवासा/सुखदेव फुलारी काल केंद्र सरकारने अचानक साखर निर्यातीवर बंदी घातल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आणि त्यामुळे साखर उद्योग आणि ऊस उत्पादक शेतकरी यांच्या मध्ये चिंतेचे वातावरण...

प्रसिद्ध गायिकेचा MMS व्हिडिओ लीक; सिनेसृष्टीत खळबळ

माय महाराष्ट्र न्यूज:अलीकडे सोशल मीडियावर जर कोणाची सगळ्यात जास्त चर्चा असेल तर ती म्हणजे भोजपुरी गायिका शिल्पी राजची. युट्युबसह अनेक प्लॅटफॉर्मवर काही आक्षेपार्ह लोकांनी शिल्पी...

खाद्यतेल स्वस्त होणार, सरकारचा मोठा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:वाढत्या महागाईपासून जनतेला दिलासा देण्यासाठी मोदी सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पेट्रोल-डिझेल आणि गॅस सिलेंडरनंतर आता खाद्यतेलही स्वस्त होणार आहे. सरकारने खाद्यतेलावरील...

सोने दरात घसरण, तर चांदीचा भाव वधारला

माय महाराष्ट्र न्यूज:आंतरराष्ट्रीय बाजारात आलेल्या घसरणीमुळे आज सकाळी भारतीय बाजारात सोने दरात घसरण झाली आहे. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या वाढीनंतर आज बुधवारी...
error: Content is protected !!