Wednesday, May 25, 2022

या एका नंबरने हॅक होईल WhatsApp Account, चुकूनही करू नका 

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:अनेकजण ऑनलाइन पेमेंट करण्यासाठी UPI चा वापर करतात. यात ट्रान्झेक्शन वेगात आणि कोणत्याही समस्येशिवाय सहज होतं.

त्यामुळेच याला अधिक पसंतीही आहे. आता WhatsApp नेही पैसे ट्रान्सफर करण्यासाठी WhatsApp Payment ची सुविधा आणली. पण WhatsApp द्वारे अनेक फ्रॉड झाल्याचं समोर आलं आहे.

नुकताच असा आणखी एक प्रकार समोर आला असून युजरचं मोठं नुकसान झालं आहे.एका युजरला एयरटेल कंपनीच्या नावाने एक कॉल आला. या कॉलमध्ये कंपनीच्या नावाने कॉल

करणाऱ्याने युजरला इंटरनेट इश्यूबाबत तक्रार आल्याचं सांगितलं. परंतु युजरने त्याचे वडील फॅमिल प्लॅन असल्याने यासंबंधी सर्व कॉल ते पाहतात तसंच सध्या ते घरी नसून नंतर कॉल करा असं युजरने फ्रॉडस्टरला सांगितलं.

युजरच्या या उत्तराने फ्रॉडस्टरने आणखी एक गोष्ट केली. युजरला 401*8404975600 डायल करण्यास सांगितलं आणि एयरटेल कॉल सेंटरकडून कोणी 1-2 दिवसांत पुन्हा कॉल करेल

असंही म्हटलं. हा WhatsApp युजर या बोलण्यात अडकला आणि त्याने फ्रॉडस्टरने सांगितलेला नंबर डायल केला.या कॉलनंतर एक धक्कादायक बाब घडली. कॉल केल्यानंतर केवळ 10 मिनिटांत

युजरला WhatsApp वर एक मेसेज आला. या मेसेजमध्ये लॉगइन पीनसाठी विचारण्यात आलं होतं, जेणेकरुन फ्रॉडस्टर एका नव्या डिव्हाइसवर आपला मोबाइल नंबर सेट करू शकतील. काही

सेकंदात युजर मोबाइल आणि लॅपटॉप दोन्हीवरुन लॉग आउट झाला. यामुळे युजर गोंधळला आणि काही वेळात WhatsApp सर्व संपर्क आपोआप गायब झाले.

युजरने जो कोड डायल केला होता त्यामुळेच हा फ्रॉड झाला. तो कोड डायल करण्याचा अर्थ युजरचे सर्व इनकमिंग कॉल्स त्या नंबरवर जातील आणि फ्रॉडस्टर युजरचं सीम कार्ड वापरू शकतील.

फ्रॉडस्टरने फोन हॅक केल्यानंतर काही मिनिटांत युजरच्या अकाउंटवरुन 45-50 लोकांना मेसेज केला होता आणि मेसेजमधून पैसे मागितले होते. तात्काळ पैशांची गरज असल्याचं सांगत

मेसेज करण्यात आले होते. काही पैसे पेटीएमवर मागितले होते. युजरच्या काही मित्रांनी 1000 रुपये, 2000 रुपयांची मदत केली. त्यानंतर फ्रॉड झाल्याचं

समजताच युजरने सायबर क्राइम डिपार्टमेंटमध्ये तक्रार दाखल केली.

ताज्या बातम्या

वर पक्षाकडून वधू कुटुंबीयांचा प्रत्येकी 10 लाख रुपयांचा विमा

भेंडा(नेवासा) नेवासा तालुक्यातील भेंडा येथील काळे परिवाराने विवाह सोहळ्यानिमित्त एक अनोखा उपक्रम राबविला.वरपक्षाने लग्नाच्या दिवशी वधूच्या कुटुंबातील 12 व्यक्तींची प्रत्येकी 10 लाखा रुपयांची विमा पॉलिसी...

साखर निर्यातीवर बंदी नसल्याचा विस्माचा खुलासा

नेवासा/सुखदेव फुलारी काल केंद्र सरकारने अचानक साखर निर्यातीवर बंदी घातल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आणि त्यामुळे साखर उद्योग आणि ऊस उत्पादक शेतकरी यांच्या मध्ये चिंतेचे वातावरण...

प्रसिद्ध गायिकेचा MMS व्हिडिओ लीक; सिनेसृष्टीत खळबळ

माय महाराष्ट्र न्यूज:अलीकडे सोशल मीडियावर जर कोणाची सगळ्यात जास्त चर्चा असेल तर ती म्हणजे भोजपुरी गायिका शिल्पी राजची. युट्युबसह अनेक प्लॅटफॉर्मवर काही आक्षेपार्ह लोकांनी शिल्पी...

खाद्यतेल स्वस्त होणार, सरकारचा मोठा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:वाढत्या महागाईपासून जनतेला दिलासा देण्यासाठी मोदी सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पेट्रोल-डिझेल आणि गॅस सिलेंडरनंतर आता खाद्यतेलही स्वस्त होणार आहे. सरकारने खाद्यतेलावरील...

सोने दरात घसरण, तर चांदीचा भाव वधारला

माय महाराष्ट्र न्यूज:आंतरराष्ट्रीय बाजारात आलेल्या घसरणीमुळे आज सकाळी भारतीय बाजारात सोने दरात घसरण झाली आहे. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या वाढीनंतर आज बुधवारी...

धक्कादायक:नवरा झोपी गेल्याचे पाहून मध्यरात्री नवरी पळून गेली अन् पुढे…

माय महाराष्ट्र न्यूज:लग्नानंतर रात्री जेवण करुन घरातील सदस्य झोपले होते. नवराही झोपी गेला. हीच रात्रीची संधी साधत नवरीने दागिने, मोबाईल घेत पळ काढला. रात्री...
error: Content is protected !!