माय महाराष्ट्र न्यूज:तुम्हाला बँकेसंबंधी काही कामं असतील तर तातडीने पूर्ण करा. कारण, पुढील तीन दिवस बँका बंद असणार आहेत. या शनिवारपासून पुढील तीन दिवस बँकांना सुट्टी असणार आहे.
मे महिन्यामध्ये बँकांना एकूण ११ सुट्ट्या आहेत. आता अर्धा महिना उलटून गेला असून अर्धा महिना अद्याप शिल्लक आहे.रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, भारतातील
अनेक भागांमध्ये १६ मे रोजी बँका बंद असणार आहेत. या दिवशी सोमवार असून बौद्ध पोर्णिमेची सुट्टी देण्यात आली आहे. याच्या आधी रविवार असल्यामुळे बँकेला सुट्टी आहे. तर शनिवारी
म्हणजेच १४ मे रोजी महिन्याचा दुसरा शनिवार असल्यामुळे बँकांना सुट्टी देण्यात आली आहे.रविवारी नेहमीच बँकांना सुट्टी असते, पण दर शनिवारी सुट्टी नसते.
महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या शनिवारी बँका काम करतात, तर दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बँका बंद असतात.दरम्यान, दर महिन्याला येणाऱ्या सुट्ट्यांची माहिती रिझर्व्ह
बँक ऑफ इंडिया (RBI) कडून प्रसिद्ध केली जाते. यासंबंधीही माहिती देण्यात आली आहे. मे महिन्याच्या सुट्या तीन भागात विभागल्या गेल्या आहेत. दरम्यान, आता या तीन सुट्टा
झाल्यानंतर २२ मे रोजी रविवार असल्यामुळे पुन्हा बँकेला सुट्टी आहे तर त्यानंतर २८ आणि २९ मे रोजी चौथा शनिवार आणि रविवार आल्यामुळे बँक बंद असेल.