Friday, May 20, 2022

आषाढी यात्रेपूर्वी विठ्ठल मंदिरात होणार हे बदल

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:विठ्ठल रुक्मिणी मूर्तीची झपाट्याने होणारी झीज समोर आणल्यानंतर राज्य शासनाने तातडीने एक बैठक घेत भारतीय पुरातत्व विभागाच्या पथकाला पाहणीसाठी पाठवले होते.

या अधिकाऱ्यांनी आता आपला अहवाल राज्य शासन आणि मंदिर समितीला दिला असून या अहवालानुसार मूर्तीला हानिकारक ठरणाऱ्या ग्रॅनाईट फारशा तातडीने काढण्याचा निर्णय मंदिर समितीच्या

बैठकीत घेण्यात आला. याच सोबत देवाला अभिषेक घालताना दूध, दही, मध आणि साखर याचा अत्यंत मर्यादित स्वरूपात वापर करून अभिषेकासाठी क्षारमुक्त आरओ पाण्याचा वापर करण्याचा

निर्णय घेण्यात आला. हा भिषेक करताना देवाच्या डोक्यावरून अतिशय हळू वेगात पाणी घालण्याचाही निर्णय घेण्यात आला. विठ्ठलाचा गाभारा लहान असून येथे भाविकांच्या

गर्दीमुळे मोठ्या प्रमाणात उष्णता आणि ह्युमिडिटी तयार होते .याचाही परिणाम मूर्तीवर होत असल्याने येथे टेम्परचर सेन्सर लावण्यात येणार आहे . मूर्तीसाठी साधारण 22 ते 25 डिग्रीपर्यंत तापमान

राखणे आवश्यक असल्याने त्याच पद्धतीने भाविकांना मर्यादित संख्येत गाभाऱ्यात सोडण्यात येणार आहे . सध्या गाभाऱ्यातील तापमान 32 ते 35 डिग्री पर्यंत जात असल्याने या उष्णतेचा त्रास मूर्तीला

होत असतो . याशिवाय गाभाऱ्यातील गरम हवा बाहेर जाण्यासाठी चौखांबी मध्ये व्यवस्था पूर्ण क्षमतेने कार्यान्वित केली जाणार आहे.

देवाच्या सजावटीसाठी वापरण्यात येणारे फळे आणि देशी विदेशी फुलांमुळे देखील मूर्तीला त्रास होत असल्याने ही सजावट गाभारा आणि चौखांबीच्या बाहेर करण्यावर विचार केला जात आहे .

याबाबत देखील पुरातत्व विभागाच्या सूचनांचे पालन होणार आहे . सध्या रुक्मिणीमातेच्या पायाची झालेली झीज पूर्ववत करण्यासाठी वज्रलेप देण्याचा निर्णय घेण्यात आला असून पुरातत्व विभागाकडून

वेळ नक्की केली जाणार असल्याचे मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले. रुक्मिणीच्या पायाची झीज झाली असताना हे समितीच्या निदर्शनास

का आणून दिले नाही असा विषय बैठकीत होऊन याबाबत जबाबदार असणाऱ्या वर कारवाई करण्याचा निर्णय देखील बैठकीत झाला आहे.

ताज्या बातम्या

नगर ब्रेकिंग: टेम्पो पलटी होऊन मोठा अपघात या अपघातात दोनजण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्याच्या संगमनेर तालुक्यातून जाणार्‍या पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील माहुली घाटात मक्याची कणसे घेऊन जाणारा टेम्पो पलटी होऊन अपघात झाला. या अपघातात दोनजण...

मोटारसायकल, स्कूटर चालकांनो सावधान!जाणून घ्या नवा नियम

माय महाराष्ट्र न्यूज:हेल्मेट घातले की आपण निर्धास्तपणे दुचाकी वाहन चालवू शकू आणि आपल्याला कोणत्याही नियमाची अडचण येणार नाही असे तुम्हाला वाटत असल्यास तुम्ही सावध होण्याची...

महिला अ‍ॅथलीटने लग्नापूर्वी शारीरिक संबंध ठेवण्याबाबत मोठे विधान

माय महाराष्ट्र न्यूज:अ‍ॅथलीट म्हटलं तर दररोजचा व्यायाम आलाच. फिट राहण्यासाठी रोज सकाळी पहाटेची झोप मोड करत व्यायाम करावाचं लागतो. तसेच सेक्स लाईफबाबतही अनेक खेळाडूंना कॉम्प्रॉमाईस...

नगर जिल्ह्याच्या शेजारील जिल्ह्यातील घटना:मुलाने आईला प्रियकरासोबत बघितले आक्षेपार्ह अवस्थेत मग काय घडले नको ते

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा औरंगाबाद जिल्ह्यातून एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.आईच्या अनैतिक संबंधामुळे...

बँकेच्या नियमात मोठा बदल, व्यवहारासाठी आता या गोष्टी आवश्यक

माय महाराष्ट्र न्यूज:केंद्र सरकार लोकांच्या सुविधा आणि सुरक्षितता लक्षात घेऊन आवश्यक ती पावले उचलत आहे. गेल्या काही वर्षांपासून देशात डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी मोदी...

ATM मधून कॅश काढण्याच्या नियमात बदल, अन्यथा

माय महाराष्ट्र न्यूज:बँकिंग व्यवहारात एटीएममधून पैसे काढणं हा प्रत्येकाच्या गरजेचा भाग बनला आहे. पण अनेकदा एटीएम कार्डमधील माहितीचा गैरवापर करून ग्राहकांच्या खात्यातून परस्पर पैसे...
error: Content is protected !!