Friday, May 20, 2022

राहुरी, श्रीरामपूर, व नेवासा तालुक्यातील विविध प्रश्नावर जलसंपदा मंत्री कडू यांच्या दालनात बैठक

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:प्रहारचे जिल्हाध्यक्ष अभिजित पोटे व श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष आप्पासाहेब ढुस यांच्या मागणी नुसार जलसंधारण राज्यमंत्री बच्चू कडू यांचे दालनात व उपस्थितीमध्ये

अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी, श्रीरामपूर व नेवासा तालुक्यातील विविध विषयांवर दुपारी १२.३० वा. बैठक संपन्न झाली.  या बैठकीस प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष अभिजीत दादा पोटे,

प्रहार चे श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष आप्पासाहेब ढुस यांचे सह पाटबंधारे विभागाचे मुख्य सचिव, कक्ष अधिकारी, गोदावरी जायकवाडी महामंडळाचे चिफ इंजिनिअर जयंत गवळी (जलसंपदा विभाग),

अधिक्षक अभियंता समाधान सब्बीनवार यांचेसह अहमदनगर जिल्ह्यातील सर्व संबंधीत अधिकारी उपस्थित होते.        प्रसंगी या बैठकीत श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील टाकळीभान

टेल टॅंक साठी शासन निकषानुसार भंडारदरा धरणातून पिण्यासाठी पाणी राखीव ठेवणेचा महत्वपूर्ण निर्णय झाला. तसेच टाकळीभान टेल टॅंक कमी कालावधीत भरणेसाठी टॅंकचे गेट बदलून नवीन

गेटच्या इस्टिमेटला मंजुरी देऊन तात्काळ काम सुरू करणेचे आदेश देणेत आले.तसेच देवळाली प्रवरा ता. राहुरी येथील प्रसादनगर भागात असलेल्या शिंगी प्लॉट मधील अनधिकृत झोपडपट्टी मध्ये नवीन

अंगणवाडीसाठी प्रस्ताव सादर करण्याचे संबंधितांना मंत्री महोदयांनी आदेश दिले.  तसेच देवळाली प्रवरा ता. राहुरी हद्दीतील पाणी वापर संस्थांचे पुनर्विलोकन करणेसाठी तात्काळ माहिती सादर करण्याचे संबंधितांना या प्रसंगी ना. बच्चूभाऊ कडू यांनी आदेश दिले.

या बैठकीत नेवासा तालुक्यातील सुरेगाव गंगा येथील जायकवाडी पाटबंधारे विभागाकडे जमीन संपादनासाठी प्रलंबित असलेल्या फाईल या शेतकरी प्रश्नावर माहिती सादर करण्यात हलगर्जीपणा

दाखविणाऱ्या अधिकाऱ्यांची मंत्री महोदयांनी कान उघाडणी करून त्यांचेवर उच्चस्तरीय चौकशी करून कारवाईचे मुख्य सचिवांना आदेश दिले. व सुरेगावच्या शेतकऱ्यांचा प्रश्न तात्काळ मार्गी लावण्याचे आदेश दिले.

गेल्या वर्षी कोरोना काळात ना. बच्चूभाऊ कडू यांनी टाकलीभान येथील प्रहार च्या अन्न छत्राला भेट दिली असता प्रहार चे जिल्हा कार्याध्यक्ष नवाज शेख यांनी टाकळीभान व परिसरातील गावकऱ्यांच्या

वतीने भविष्यातील भंडारदरा धरणातील टेल टॅंक मध्ये कायम स्वरुपी आरक्षित हक्काचे मिळणेसाठी दिलेल्या शब्दाची आज वचन पूर्ती केल्याबद्दल जिल्हाध्यक्ष अभिजित पोटे यांनी ना. बच्चूभाऊ कडू यांचे आभार मानले.

ताज्या बातम्या

मोटारसायकल, स्कूटर चालकांनो सावधान!जाणून घ्या नवा नियम

माय महाराष्ट्र न्यूज:हेल्मेट घातले की आपण निर्धास्तपणे दुचाकी वाहन चालवू शकू आणि आपल्याला कोणत्याही नियमाची अडचण येणार नाही असे तुम्हाला वाटत असल्यास तुम्ही सावध होण्याची...

महिला अ‍ॅथलीटने लग्नापूर्वी शारीरिक संबंध ठेवण्याबाबत मोठे विधान

माय महाराष्ट्र न्यूज:अ‍ॅथलीट म्हटलं तर दररोजचा व्यायाम आलाच. फिट राहण्यासाठी रोज सकाळी पहाटेची झोप मोड करत व्यायाम करावाचं लागतो. तसेच सेक्स लाईफबाबतही अनेक खेळाडूंना कॉम्प्रॉमाईस...

नगर जिल्ह्याच्या शेजारील जिल्ह्यातील घटना:मुलाने आईला प्रियकरासोबत बघितले आक्षेपार्ह अवस्थेत मग काय घडले नको ते

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा औरंगाबाद जिल्ह्यातून एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.आईच्या अनैतिक संबंधामुळे...

बँकेच्या नियमात मोठा बदल, व्यवहारासाठी आता या गोष्टी आवश्यक

माय महाराष्ट्र न्यूज:केंद्र सरकार लोकांच्या सुविधा आणि सुरक्षितता लक्षात घेऊन आवश्यक ती पावले उचलत आहे. गेल्या काही वर्षांपासून देशात डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी मोदी...

ATM मधून कॅश काढण्याच्या नियमात बदल, अन्यथा

माय महाराष्ट्र न्यूज:बँकिंग व्यवहारात एटीएममधून पैसे काढणं हा प्रत्येकाच्या गरजेचा भाग बनला आहे. पण अनेकदा एटीएम कार्डमधील माहितीचा गैरवापर करून ग्राहकांच्या खात्यातून परस्पर पैसे...

हेल्मेट घातलं असेल तरी भरावा लागणार दंड

माय महाराष्ट्र न्यूज:हेल्मेट न घालता दुचाकी चालवल्याबद्दल तुम्ही ऐकलं असेलच. पण आता हेल्मेट घातलं असेल तरी चालान कापलं जाऊ शकतं. हे चलनही थोडं-थोडकं नसून...
error: Content is protected !!