माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर:निखिल वागलाणकर व इतर अज्ञात लोकांनी शरदचंद्रजी पवार साहेबांबद्दल भडकाऊ , चितावणी खोर व जीवे मारण्याच्या उद्देशाने शरद पवार बारामतीचा
गांधी असे संबोधून त्यांची हत्या करण्याची हीच वेळ आलेली आहे . त्यासाठी वारामतीचा नथुराम गोडसे तयार व्हा असे आव्हान करून ट्विटर अकाऊंटवरुन पोस्ट केली आहे . यापूर्वी शरद पवार
यांच्यावर एक हल्ला झाला आहे . त्यामुळे शरद पवारांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे . तरी उपरोक्त विषया संदर्भात नमूद आरोपी व इतर अज्ञात आरोपी विरुद्ध १०७ , १५३ अ . ५०४ , ५०६ व माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६६ अ , ६६ एफ कलामांतर्गत कायदेशीर कारवाई करून कडक शासन करावे.
तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सातारा येथे एका कार्यक्रमात जवाहर राठोड यांची पाथरवट या कवितेतील काही ओळी चा उल्लेख केला होता परंतु भारतीय जनता पार्टीच्या
https://twitter.com/bjp4maharashtra?t=RPPT06k4PfolmoKuh muwg & s = 08 @ BJP4Maharashtra ट्विटर हँडलवरुन शरद पवार यांचा अर्धवट व्हिडीओ चा काही भाग खाडाखोड करून समाज माध्यमात शरद पवार
हिंदुद्वेषी आहेत असे पसरविण्यात आले आहे राज्यात सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे राज्यात कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे त्या अनुषंगाने https : // @
BJP4Maharashtra या ट्विटर हँडलवर ४ ९९ , ५०० , ६६ अ व ६६ एफ या कलमा अंतर्गत कारवाई करण्यात यावी अशी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुरज चव्हाण यांनी विशेष पोलीस महानिरीक्षक मुंबई यांच्याकडे केली आहे.