Thursday, October 5, 2023

तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या हस्ते नागपुरात पक्ष कार्यालयाचे उद्घाटन

WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: राहुल कोळसे: अहमदनगर:तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव (KCR) यांनी आज (गुरुवार) नागपुरात त्यांच्या पक्षाच्या महाराष्ट्रातील विदर्भातील पहिल्या कार्यालयाचे उद्घाटन केले.

केसीआरची भारत राष्ट्र समिती (BRS) तेलंगणाव्यतिरिक्त इतर राज्यांमध्ये आपला पाया वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. नागपूर कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी केसीआरच्या उपस्थितीसह विदर्भातील बीआरएस सदस्यांनी इतर अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले.

केसीआर यांचे नागपूर विमानतळावर भव्य स्वागत करण्यात आले. दुपारी ३.४५ च्या सुमारास ते येथे पोहोचले. त्यानंतर ते पक्ष कार्यालयाकडे रवाना झाले. तेथे त्यांनी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत कार्यालयाचे उद्घाटन केले.केसीआर म्हणाले, देशात दलितांची काय स्थिती आहे? जोपर्यंत

दलितांची गरिबी आणि त्यांच्यावर होणारे अत्याचार दूर होत नाहीत, तोपर्यंत आमच्या चेहऱ्यावरील डाग हटणार नाही. अमेरिकेत गोर्‍यांनी स्थानिकांवर अत्याचार केले. एका कार्यक्रमात मी म्हटलं होतं की, बराक ओबामा यांना राष्ट्राध्यक्ष करून अमेरिकेने आपली पापं धुवून काढली

जोपर्यंत दलितांवर अत्याचार होत राहतील, तोपर्यंत आपल्याला शांतता मिळणार नाही… आदिवासी किती दिवस त्यांच्या हक्कांसाठी लढणार?काही होणार नाही. जोपर्यंत देश आणि त्याची विचारधारा बदलत नाही. फक्त निवडणुका येतील आणि जातील आणि नाटक चालेल.केसीआर यांना त्यांच्या

पक्षाला राष्ट्रीय पातळीवर घेऊन जायचे आहे. त्यासाठी पक्षाचा विस्तार केला जात आहे. पुढील वर्षी होणा-या लोकसभा निवडणुकीत पक्ष आपली स्थिती मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे. केसीआर तिथल्या कार्यकर्त्यांची बैठक घेऊन त्यांना जनआधार वाढवण्याचा

मंत्र देणार आहेत. यासोबतच तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांचे आणखी अनेक कार्यक्रम होणार आहेत. बीआरएस ‘अबकी बार किसान सरकार’चा नारा देत निवडणूक लढवणार आहे. हा नारा देत बीआरएसने शेतकऱ्यांना आपल्या बाजूने उभे करण्याची योजना आखली आहे.गेल्या महिन्यात, KCR यांनी महाराष्ट्रातील

शहरी संस्थांमधील 45,000 हून अधिक गावांमध्ये BRS पक्षाचे जाळे विस्तारण्यासाठी महिनाभराचा कार्यक्रम जाहीर केला.केसीआर यांनी नुकतेच महाराष्ट्राच्या काही भागात सभा घेतल्या. नांदेडमध्ये सर्वाधिक सभा त्यांनी केल्या. येथे त्यांनी केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या

नेतृत्वाखालील सरकार आणि महाराष्ट्रातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकार शेतकरी आणि दलितांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला.आपला देश कृषी प्रधान आहे तरीही १ लाख कोटीचे पामतेल आयात करतोय. हे तात्काळ थांबायला हवंसर्वांना आवाहन

करतोय की देशात चांगल्या दर्जाच्या परिवर्तनाची गरज आहेचायनातून बऱ्याच गोष्टी आयात करतोय. आपण बनवू शकतो त्या गोष्टीही आपण आयात करतोयसंविधान, ज्युडीसरी अशा बऱ्याच गोष्टीत स्ट्रक्चरल बदल होणं गरजेचं आहेपाणी आणि वीज महत्त्वाचे विषय. गरजेपेक्षा जास्त पाणी आपल्याकडे आहे.

गेल्या ७५ वर्षांत धोरणं न बदलल्याने ८० टक्के पावसाचं पाणी समुद्रात वाहून जात आहे. पाणी प्रश्नावर राज्यांना आपापसात का लढवलं जातंय? अन्न प्रक्रिया उद्योग वाढून, निर्यात वाढायला हवी पण तसं होतांना दिसत नाही. दमदार सरकार असलं तर देशात अशी शेती आहे, की प्रत्येक एकरात पाणी दिलं जाणं शक्य आहे.

स्वातंत्र्यांच्या ७५ वर्षांत देशाची राजधानी दिल्लीत पाण्याची समस्या आहे. आज प्रत्येक गोष्टीत आपण खाली चाललोय, असं त्यांनी नमूद केलं.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!