Wednesday, May 25, 2022

नगर ब्रेकिंग:खळबळजनक:या महिला जिल्हा परिषद सदस्यांना जीवे मारण्याची धमकी

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्या, राष्ट्रवादी पक्षाच्या महिला सदस्या, आदिवासी विकास प्रकल्पस्तरीय समिती सदस्या

सुनीता भांगरे याना फोनवरून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी राजूर पोलिस स्टेशनला तक्रार दाखल करण्यात आली आहे.

याबाबत समजते की, एकात्मिक आदिवासी प्रकल्प अंतर्गत चालविण्यात येणाऱ्या आश्रमशाळामधील सुविधांचा अभाव अंधाधुंद कारभाराबाबत जिल्हा परिषद सदस्या तसेच आदिवासी

विकास प्रकल्प समितीच्या सदस्या सुनीता भांगरे यांनी आश्रमशाळांना भेटी देऊन तेथील कारभाराचा पंचनामा केला म्हणून त्याचा राग मनात धरून एका मुख्याध्यापकांच्या भावाकडून

मोबाईल नंबरवरून मुतंखेल आश्रमशाळेतील मुख्याध्यापकांचा भाऊ बोलतोय सांगून त्यांना फोन करून शिवीगाळ करून, आमच्या वाट्याला जाऊ नका, असे सांगून खूनाची धमकी दिली.

याबाबत राजूर पोलिसांकडे रितसर फिर्याद देण्यात आली आहे. रामेश्वर गजानन शातलवार (रा.डोंबिवली) यांचेवर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे यांनी सांगितले.

आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी यांच्याशी संपर्क केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.राष्ट्रवादी पक्षाच्या जिल्हा परिषद महिला सदस्यांना खुनाची धमकी देण्यात आल्याने

राष्ट्रवादी पक्षाच्या महिला सदस्या आक्रमक झाल्या असून, आरोपीस अटक करून कारवाई करावी अशी मागणी महिलांनी केली आहे.

ताज्या बातम्या

मोदी सरकार साखर निर्यातीवर बंदी घालण्याच्या तयारीत ?

माय महाराष्ट्र न्यूज:जगात साखरेचं सर्वाधिक उत्पादन भारतात होतं. तर साखरेच्या निर्यातीत भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. जगभरात भारतापेक्षा जास्त फक्त ब्राझील हा देश सर्वाधिक साखर...

मोठी बातमी:पंकजा मुंडेंना राष्ट्रवादी येण्याची आॅफर

माय महाराष्ट्र न्यूज:भाजपमध्ये ओबोसींचा अपमान केला जात आहे. काल औरंगाबादेत जल आक्रोश मोर्चामध्ये केंद्रीय राज्यमंत्र्यांना बाऊंसरची भूमिका वठवावी लागली. हे पाहून हसांव की रडावं, असा...

पुढील वर्षी साखर कारखाने सुरू करण्याबाबत अजित पवारांनी घेतला ‘हा’ निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात अद्यापही 16 लाख मेट्रीक टन ऊसाचे गाळप राहिले आहे. मराठवाडा, सोलापूर, सातारा, उस्मानाबाद, बीड या भागातील सर्वात जास्त ऊस शिल्लक राहिल्याने...

मोठी बातमी: इंदोरीकर महाराजांचे आठ दिवसांचे नियोजित कार्यक्रम रद्द

माय महाराष्ट्र न्यूज:कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांचे आठ दिवसांचे नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. इंदोरीकर महाराजांचं महाराष्ट्रात मोठं नाव आहे. ते प्रसिद्ध...

नगरसह या जिल्ह्यांत पावसाचा अंदाज 

माय महाराष्ट्र न्यूज:मागच्या चार दिवसांपूर्वी कोल्हापूर, सांगली, सोलापूर आणि विदर्भातील काही भागात मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावली होती. दरम्यान पुढील चार दिवस पुन्हा पावसाची शक्यता...

सरकारने बदलला सीम घेण्यासंदर्भात महत्त्वाचा नियम

माय महाराष्ट्र न्यूज:आपल्याला सिम कार्ड घ्यायचं असेल तर काय करावं लागतं? आपण कोणत्याही मोबाइल स्टोरवर जाऊन आपलं ओळखपत्र देतो, त्याद्वारे सिम अलॉट केलं जातं आणि...
error: Content is protected !!