माय महाराष्ट्र न्यूज:हिंदू धर्मात नारळाला शुभ मानले जाते. यासाठी पुजा तसेच अनेक धार्मिक कार्यांची सुरूवात नारळ फोडून केली जाते.
नारळाशिवाय विशेष पुजा-पाठ, हवन तसेच अनेक शुभ कार्यांना अर्धवट मानले जाते. शास्त्रातही नारळाला श्रीफळ म्हटले गेले आहे. यातील पाणी हे अमृतासमान मानले जाते. मात्र पुजेसंबंधी
कार्यामध्ये महिलांना नारळ फोडण्यास मनाई असते. असे का असते.संस्कृतमध्ये नारळास श्रीफळ म्हटले जाते. खरंतर, नारळ माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूचे फळ असते म्हणूनच यास
श्रीफळ म्हटले जाते. अशी मान्यता आहे की जेव्हा विष्णूने पृथ्वीवर अवतार घेतला तेव्हा ते स्वर्गातून आपल्यासोबत लक्ष्मी माता, नारळाचे झाड आणि कामधेनु या तीन गोष्टी घेऊन आले होते.
यासाठी नारळाला श्रीफळ म्हटले जाते. नारळामध्ये त्रिदेव म्हणजेच ब्रम्हा, विष्णू आणि महेश यांचा वास असतो. याच कारणामुळे हिंदू धर्मात विविध धार्मिक कार्यामध्य नारळ चढवण्याचे महत्त्व आहे.
पुजा-पाठ अथवा शुभ कार्यात वापरला जाणारा नारळ महिला फोडू शकत नाहीत. ही परंपरा अनेक युगांपासून चालत आली आहे. शास्त्रात यास अशुभ मानले जाते. ज्योतिषानुसार महिला पुजा-पाठसारख्या
कार्यांमध्ये नारळ चढवू शकतात मात्र ते फोडू शकत नाही. याच कारणमुळे नारळाला बीजरूप मानले गेले आहे. स्त्री बीज रूपात एका बाळाला जन्म देते. यासाठी नारळ अथवा श्रीफळ फोडण्यास
स्त्रियांना मनाई केली जाते. जर एखादी महिला नारळ फोडते तर तिला गर्भधारणेसाठी समस्या होते. तिला संतानसुख मिळण्यास त्रास होतो. याच कारणामुळे महिलांना नारळ फोडण्यास दिला जात नाही.
हिंदू धर्माशी जोडलेल्या अनेक परंपरा आणि रिती-रिवाजामध्ये नारळाचे विशेष महत्त्व आहे. विवाह ठरल्यानंतर तिलक करताना, जनेऊ संस्कार, हळदीसारख्या समारंभात नारळ भेटस्वरूप दिले जाते.
याशिवाय कलश स्थापना, यज्ञ, होमसारख्या धार्मिक कार्यांमध्येही नारळाचा वापर केला जातो.