माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील गुहा परिसरामध्ये तीन दिवसापूर्वी पोलीस उपाध्यक्ष संदीप मिटके व पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या
पथकाने छापेमारी करत चार महिलांना ताब्यात घेतले आहे .यामध्ये तीन महिलांची मुक्तता करण्यात आली आहे .मुख्य आरोपी असलेल्या एका महिलेवर देह व्यापार कलमान्वये गुन्हा दाखल करून पोलिसांनी गजाआड केले आहे.
पकडलेल्या मुख्य आरोपी पहिली कडील मोबाईल मधील राहुरी शहरासह तालुक्यातील अनेक राजकीय, सामाजिक तसेच व्यापारी क्षेत्राशी निगडित असलेल्याची मोबाईल नंबर आढळून आले आहे.
पोलीस या नंबर सेव असलेल्या मोबाईल नंबर पर्यंत पोहोचणार असल्याची चर्चा अन् त्या महिलेच्या संपर्क असलेल्या काही मंडळींची पायाखालची वाळू सरकली आहे तालुक्यातील
गुहा शिवारात मध्य वस्तीत गुप्त बातमी द्वारा मार्फत माहिती काढून पोलिस पथकाने छापा मारत येथे अनैतिक देह व्यवहार करत असलेल्या तीन महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते यामध्ये त्यांची मुक्तता केली आहे.
दरम्यान तरी एका मुलीवर अनैतिक व्यवहार कलमान्वये राहुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र पकडलेल्या त्या महिलेच्या मोबाईल मध्ये अनेक प्रतिष्ठित राजकारणी व व्यापारी
क्षेत्राशी निगडित असलेले यांची मोबाईल नंबर त्यांमध्ये असल्याने अनेकांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.