Wednesday, May 25, 2022

आनंदाची बातमी:मान्‍सूनसाठी पोषक हवामान तयार

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

 

 

माय महाराष्ट्र न्यूज:बंगालच्या उपसागरातील ‘असानी’ चक्रीवादळ निवळत असतानाच अंदमान-निकोबार बेट समूहावर नैऋत्य मोसमी वारे (मान्सून) दाखल होण्याची शक्यता आहे.

त्यास पोषक हवामान तयार झाले आहे. तो दक्षिण अंदमान समुद्र आणि लगत असलेल्या आग्नेय बंगालच्या उपसागरात दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे

देशात २७ मे रोजी म्हणजे चार दिवस अगोदर मान्सूनचा प्रवेश होणार असल्याचे हवामानतज्ज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी स्पष्ट केले आहे. खासगी संस्था स्कायमेटनेही २६ मे रोजी मान्सून भारतीय भूभागावर पोहोचू शकतो, असे म्हटले आहे.

स्वतंत्र भारताच्या इतिहासात ४० व्या वेळेस मान्सून निश्चित तारखेच्या (१ जून) आधीच येणार

स्वतंत्र भारताच्या इतिहासात ४० व्या वेळेस मान्सून निश्चित तारखेच्या (१ जून) आधीच दाखल होईल. इतिहासात केवळ ६ वेळाच मान्सून नियमित तारखेला दाखल झाला आहे.

दरवर्षाचा मान्सूनचा प्रवास

दरवर्षी मान्सून २१ मेपर्यंत अंदमानात, तर १ जूनपर्यंत केरळात येतो. यंदा १५ मे रोजीच तो अंदमान समुद्रात पोहोचण्याची शक्यता आहे.

गतवर्षी असे होते मार्गक्रमण

गतवर्षी २१ मे रोजी मान्सूनने अंदमानमधील बेटांचा बहुतांश भाग व्यापला होता, तर ३ जून रोजी तो केरळमध्ये दाखल झाला होता.

यंदाच्या नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (मान्सून) हंगामात जून ते सप्टेंबर या कालावधीत ९९ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने १४ एप्रिल रोजी जाहीर केला होता.

-या अंदाजामध्ये किमान पाच टक्के कमी-अधिक बदल होण्याची शक्यताही गृहीत धरण्यात आली आहे. मान्सूनसाठी पूरक ‘ला निना’ ची स्थिती असेल, असेही हवामान खात्याचे अनुमान आहे.

बंगालच्या उपसागरातील असानी चक्रीवादळ निवळत असून आंध्रच्या किनाऱ्यावर कमी दाब क्षेत्र प्रणाली सक्रिय आहे. ती लवकरच निवळणार आहे. तोपर्यंत आंध्र प्रदेशच्या रायलसीमा भागांत

जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच महाराष्ट्र आणि दक्षिण भारतातील राज्यामध्ये ढगाळ हवामान राहणार असून, काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.

 

 

ताज्या बातम्या

मोदी सरकार साखर निर्यातीवर बंदी घालण्याच्या तयारीत ?

माय महाराष्ट्र न्यूज:जगात साखरेचं सर्वाधिक उत्पादन भारतात होतं. तर साखरेच्या निर्यातीत भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. जगभरात भारतापेक्षा जास्त फक्त ब्राझील हा देश सर्वाधिक साखर...

मोठी बातमी:पंकजा मुंडेंना राष्ट्रवादी येण्याची आॅफर

माय महाराष्ट्र न्यूज:भाजपमध्ये ओबोसींचा अपमान केला जात आहे. काल औरंगाबादेत जल आक्रोश मोर्चामध्ये केंद्रीय राज्यमंत्र्यांना बाऊंसरची भूमिका वठवावी लागली. हे पाहून हसांव की रडावं, असा...

पुढील वर्षी साखर कारखाने सुरू करण्याबाबत अजित पवारांनी घेतला ‘हा’ निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात अद्यापही 16 लाख मेट्रीक टन ऊसाचे गाळप राहिले आहे. मराठवाडा, सोलापूर, सातारा, उस्मानाबाद, बीड या भागातील सर्वात जास्त ऊस शिल्लक राहिल्याने...

मोठी बातमी: इंदोरीकर महाराजांचे आठ दिवसांचे नियोजित कार्यक्रम रद्द

माय महाराष्ट्र न्यूज:कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांचे आठ दिवसांचे नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. इंदोरीकर महाराजांचं महाराष्ट्रात मोठं नाव आहे. ते प्रसिद्ध...

नगरसह या जिल्ह्यांत पावसाचा अंदाज 

माय महाराष्ट्र न्यूज:मागच्या चार दिवसांपूर्वी कोल्हापूर, सांगली, सोलापूर आणि विदर्भातील काही भागात मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावली होती. दरम्यान पुढील चार दिवस पुन्हा पावसाची शक्यता...

सरकारने बदलला सीम घेण्यासंदर्भात महत्त्वाचा नियम

माय महाराष्ट्र न्यूज:आपल्याला सिम कार्ड घ्यायचं असेल तर काय करावं लागतं? आपण कोणत्याही मोबाइल स्टोरवर जाऊन आपलं ओळखपत्र देतो, त्याद्वारे सिम अलॉट केलं जातं आणि...
error: Content is protected !!