नेवासा/ प्रतिनिधी
विद्यार्थ्यांनी शाळेत प्रवेश घ्यावा यासाठी शाळा पूर्वतयारी मेळावे व प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरे होतात.परंतु एक भन्नाट पध्दतीने नेवासे शहरातील जिल्हा परिषदेतील मुलांच्या शाळेत प्रवेश घेणाऱ्या पहिलीच्या मुलांचे लाल-अंबर दिव्याच्या गाडीत बसण्याचे व भविष्यात शिक्षण घेऊन अधिकारी होण्याचे स्वप्न अनं प्रेरणा मिळावी या उद्देशाने आज शाळेच्या पहिल्याच दिवशी अनोखे स्वागत केले.
जीवनात शिकून मोठे होऊन अधिकारी व्हावे व लाल दिव्याच्या गाडी मिळावी, प्रशासन चालवावे ,असे प्रत्येक पालकांना आपल्या मुलाबद्दल वाटते या उद्देशाने नेवासा शहरातील जिल्हा परिषदेच्या शाळेत शाळेच्या पहिल्या दिवशी नवागतांचे स्वागत शासनाच्या लाल दिव्याच्या गाडीत दिमाखात, रुबाबात बसून बसून वाजणाऱ्या सायरन च्या आवाजात, पारंपारिक ढोल लेझीम पथकाच्या चालीत, औक्षण करत विद्यार्थ्यांना फुगे, चॉकलेट व टोप्या घालून अतिशय जल्लोषात व उत्साही वातावरणात झाले.
यावेळी संपन्न झालेल्या स्वागताच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून नेवासा पोलीस स्टेशनचे निरीक्षक शिवाजी डोईफोडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर थोरात,नायब तहसीलदार संदीप चिंतामण, गटशिक्षणाधिकारी शिवाजी कराड, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्षा स्मिता अंबिलवादे, डायट चे आशिष राऊत आधी उपस्थित होते.
शाळेच्या मुख्याध्यापिका पुष्पा ठुबे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करत सर्वांचे स्वागत केले. यावेळी गटशिक्षणाधिकारी शिवाजी कराड यांनी जिल्हा परिषद अंतर्गत विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या मोफत पाठ्यपुस्तके व गणवेश तसेच शिष्यवृत्ती लाभाच्या योजना बद्दल माहिती दिली, तसेच शाळेच्या या नाविन्यपूर्ण उपक्रमांबद्द्ल कौतुक करत अभिनंदन केले. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी पुस्तके व गणवेश,चॉकलेट वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक आण्णासाहेब शिंदे यांनी तर आभार जेष्ठ शिक्षक अरविंद घोडके यांनी मांडले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षक साईनाथ वडते,राहुल आठरे, शिक्षिका छाया वाघमोडे, प्रतिभा पालकर, ज्योती गाडेकर, प्रतिमा राठोड, विद्या खामकर,मीनाक्षी लोळगे, अश्विनी मोरे, प्रतिभा गाडेकर आदि नी प्रयत्न केले. या प्रवेशोत्सव मेळाव्यासाठी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपल्या मुलाला लाल दिव्याच्या गाडीत बसून पालकांच्या चेहऱ्यावर होणारा आनंद दिसून येत होता.
*पुष्पा ठुबे(मुख्याध्यापिका)…
आज विद्यार्थ्यांच्या शाळेत पहिले पाऊल पडल्याने त्यांचा आनंद द्विगुणित होण्यासाठी त्यांना सजवलेल्या जिप्सी गाडीतून सवारी मारली व लाल दिव्याच्या गाडीत बसण्याचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी विध्यार्थ्यांना शिकण्याची प्रेरणा मिळवण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबवला.
*आशिष राऊत(पालक)…
शाळेच्या पहिल्या दिवशी माझ्या मुलाला सजवलेल्या जिप्सी गाडीतून फिरवल्याने आनंद वाटला. विद्यार्थ्यांना लाल दिव्याच्या गाडीत बसल्यामुळे त्यांना भविष्यात शिकण्याची व अधिकारी बनण्याची मनात जिद्द निर्माण होईल
*शिवाजी कराड (गटशिक्षणाधिकारी नेवासा)..
शाळापूर्व तयारीच्या प्रवेशोत्सव दुसऱ्या मेळाव्या मध्ये नवगतांच्या स्वागतासाठी सजवलेल्या जिप्सी गाडीतून फेरी व चिमुकल्या मुलांना सायरन वाजणाऱ्या लाल दिव्याच्या गाडीत बसल्यामुळे आनंद मिळाला. अनोख्या पद्धतीने नवागतांचे झाले.