Monday, May 23, 2022

मंत्री तनपुरे यांच्या प्रयत्नातून मंजूर रस्त्याचे काम वनविभागाने थांबवले

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या मतदार संघातील वांबोरी ते शेंडी रस्त्यांचे काम ८० टक्क्यांपर्यंत पूर्ण झाले आहे. परंतु, याच जिल्हा मार्गातील वांबोरी

घाटातील काम वनविभागाने परवानगी घेतली नसल्याच्या कारणास्तव महिनाभरापासून थांबवले आहे. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी स्थळ पाहणी अहवाल उपवनसंरक्षकांकडे ठेवला असल्याचे सांगितले.

नगर-वांबोरी रस्त्याच्या दुरवस्थेचा मुद्दा विधानसभा निवडणुकीत प्रचारात चांगलाच गाजला होता. राहुरी मतदार संघातून प्राजक्त तनपुरे यांच्या रूपाने मंत्रीपदही मिळाले. पदाच्या माध्यमातून

मंत्री तनपुरे यांनी वांबोरी ते शेंडी रस्त्याच्या डांबरीकरणाचे तसेच याच मार्गावरील घाट ते वांबोरीपर्यंत रुंदीकरणाचे काम मंजूर करून आणले. रस्त्याच्या कामाला उन्हाळ्यात गती देण्यात आली.

परंतु, वांबोरी घाटात काम सुरू असतानाच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी ते काम बंद पाडले.घाट परिसर हे राखीव वनक्षेत्र असल्याने या परिसरातून जाणाऱ्या रस्त्याचे काम करण्यासाठी

वनविभागाची परवानगी आवश्यक असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. तथापि, अशी कोणतीही परवानगी सार्वजनिक बांधकाम अथवा विकासकाने घेतली नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

काम बंद असल्यामुळे घाटाची दुरवस्था होऊन अनेकजणांना अपघात होत आहेत. याप्रश्नी काही सामाजिक संघटना आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत.

ताज्या बातम्या

नगर ब्रेकिंग: संतापजनक:विवाहितेवर सासरच्या दारातच अंत्यसंस्कार

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील निळवंडे येथे शेततळ्यातील पाण्यात विवाहित महिलेचा मृतदेह तरंगताना आढळून आला. शीतल सतिष केरे असे मयत विवाहितेचे नाव...

चाणक्याच्या ‘या’ गोष्टींनी करा दिवसाची सुरुवात, तुम्ही कधीही नाही होणार अपयशी

माय महाराष्ट्र न्यूज:चाणक्य नीतीनुसार कोणतेही काम करताना त्याच्या सुरुवातीकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. कारण जेव्हा एखाद्या गोष्टीची सुरुवात चांगली होते तेव्हा तिचा शेवटही चांगला...

नवरा-बायकोमध्ये सतत वाद होतायत, हे उपाय केल्यास वाढेल प्रेम

माय महाराष्ट्र न्यूज: व्यस्त जीवनशैलीमुळे नवरा-बायको एकमेकांसोबत जास्त वेळ घालवू शकत नाहीत. वेळेची कमतरता आणि अनेक कारणामुळे अनेकदा नात्यामध्ये गैरसमज निर्माण होतात. अशातच या...

जे नको व्हायला हवे तेच घडले;ओमायक्रॉनचा तो प्रकार भारतात आढळला

माय महाराष्ट्र न्यूज:ऑनलाईन ओमायक्रॉनचा नवा उपप्रकार BA.5 ची नोंद तेलंगणामध्ये झालेली आहे. पूर्ण लसीकरण झालेल्या ८० वर्षं वयाच्या एका वृद्धात कोव्हीड विषाणूचा हा नवा...

नगर जिल्ह्यातील या भाजपाच्या नेत्यांचा निशाणा : शरद पवार यांची ही जुनीच नीती

माय महाराष्ट्र न्यूज:राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ब्राह्मण समाजाच्या बोलावलेल्या बैठकीवर भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'जो बूॅंदसे गई...

नगर जिल्ह्यात खरिपासाठी पहिल्या टप्प्यात फक्त इतके बियाणे उपलब्ध

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात खरीप हंगामाची जय्यत तयारी सुरू असून १७ प्रमुख पिकांसह इतर पिकांच्या बियाणांचे नियोजन आखण्यात आले आहे. जिल्ह्यासाठी सुमारे ७० हजार २१...
error: Content is protected !!