Friday, May 20, 2022

मान्सून या तारखेला महाराष्ट्रात धडकणार!

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:देशात उष्णतेचा पारा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. उकाड्यामुळे सर्वजण हैराण झाले आहेत. कधी पासून येतोय असे सर्वांना वाटत आहे. अशामध्ये पावसाची आतुरतेने

वाट पाहणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. यावर्षी मान्सून वेळेआधीच धडकणार आहे. येत्या 27 मे रोजी मान्सूनचे केरळमध्ये आगमन होणार असल्याची माहिती भारतीय हवामान

खात्याने दिली आहे. महाराष्ट्रातील जनतेसाठी देखील आनंदवार्ता आहे. कारण पोषक वातावरण राहिल्यास त्या पुढच्या सात दिवसात मान्सून महाराष्ट्रात येऊन धडकणार आहे.

केरळमध्ये मान्सून हा साधारणपणे 31 मे रोजी दाखल होत असतो. गेल्या वर्षी जूनमध्ये मान्सून दाखल झाला होता. आता या वर्षी आलेल्या ‘असानी’ चक्रीवादळामुळे मान्सूनचे आगमन

जरा लवकरच होणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. चक्रीवादळाचा काही प्रमाणात मान्सूनवर परिणाम होणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

त्यामुळे यावर्षी चार दिवस आधी मान्सून केरळमध्ये धडकणार आहे असे भारतीय हवामान खात्याने सांगितले आहे. पुणे हवामान विभागाचे प्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांनी देखील ट्वीट करत ही माहिती दिली आहे.

भारतात पाच दिवस मान्सून आधी धडकणार असल्यामुळे याचा फायदा हा देशातील शेतकरी तसेच भारतीय अर्थव्यवस्थेवर होणार आहे. दरम्यान, यावर्षी देशामध्ये सरासरीच्या

99 टक्के पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने व्यक्त केला आहे. यंदा देशात चांगला पाऊस होणार असल्याने बळीराजाला आनंद झाला आहे. कारण यावर्षी पिकाला मुबलक प्रमाणात पाणी मिळणार आहे.

ताज्या बातम्या

महिला अ‍ॅथलीटने लग्नापूर्वी शारीरिक संबंध ठेवण्याबाबत मोठे विधान

माय महाराष्ट्र न्यूज:अ‍ॅथलीट म्हटलं तर दररोजचा व्यायाम आलाच. फिट राहण्यासाठी रोज सकाळी पहाटेची झोप मोड करत व्यायाम करावाचं लागतो. तसेच सेक्स लाईफबाबतही अनेक खेळाडूंना कॉम्प्रॉमाईस...

नगर जिल्ह्याच्या शेजारील जिल्ह्यातील घटना:मुलाने आईला प्रियकरासोबत बघितले आक्षेपार्ह अवस्थेत मग काय घडले नको ते

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा औरंगाबाद जिल्ह्यातून एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.आईच्या अनैतिक संबंधामुळे...

बँकेच्या नियमात मोठा बदल, व्यवहारासाठी आता या गोष्टी आवश्यक

माय महाराष्ट्र न्यूज:केंद्र सरकार लोकांच्या सुविधा आणि सुरक्षितता लक्षात घेऊन आवश्यक ती पावले उचलत आहे. गेल्या काही वर्षांपासून देशात डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी मोदी...

ATM मधून कॅश काढण्याच्या नियमात बदल, अन्यथा

माय महाराष्ट्र न्यूज:बँकिंग व्यवहारात एटीएममधून पैसे काढणं हा प्रत्येकाच्या गरजेचा भाग बनला आहे. पण अनेकदा एटीएम कार्डमधील माहितीचा गैरवापर करून ग्राहकांच्या खात्यातून परस्पर पैसे...

हेल्मेट घातलं असेल तरी भरावा लागणार दंड

माय महाराष्ट्र न्यूज:हेल्मेट न घालता दुचाकी चालवल्याबद्दल तुम्ही ऐकलं असेलच. पण आता हेल्मेट घातलं असेल तरी चालान कापलं जाऊ शकतं. हे चलनही थोडं-थोडकं नसून...

नगर ब्रेकिंग:सोशल मीडियावर बनावट अकाऊंट: अश्लील मेसेज पाठवून महिलांची बदनामी

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातून एक खळबळजनक आणि चीड आणणारी बातमी समोर आली आहे.इंस्टाग्राम आणि शेअर चॅटवर बनावट अकाऊंट तयार करून तसेच अश्लील मेसेज...
error: Content is protected !!