माय महाराष्ट्र न्यूज:राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधातील आक्षेपार्ह भाषेतील पोस्ट फेसबुकवर शेअर केल्यानं मराठी अभिनेत्री
केतकी चितळे (Ketaki Chitale) वादात सापडली आहे. तिच्यावर चहुबाजूने टीका होत आहे. दुसरीकडे तिच्याविरोधात ठाण्यातील कळवा पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल
करण्यात आला आहे. केतकीवर चहुबाजूने टीकेची झोड उठवली असतानाच बारामती येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला ही आक्रमक झाले आहे त्यांनी या घटनेचा निषेध केला आहे आणि बारामती
पोलीस स्टेशनला निवेदन देऊन कारवाई करण्याची मागणी बारामती महिला तालुका अध्यक्षा वनिता बनकर, युवती अध्यक्षा भाग्यश्री धायगुडे यांनी केली आहे.बारामती पोलीस स्टेशनला दिलेल्या निवेदनात म्हटले
आहे की केतकी चितळे नावाच्या महिलेने Ketaki Chitale या फेसबुक आकाउंट वरून अॅड . नितीन भावे याने लिहीलेली पोस्ट शेअर केली असुन आमचे दैवत व देशाचे नेते पद्मविभूषण मा.खा.श्री . शरदचंद्रजी
पवार यांच्या बद्दल आमच्या भावना दुखावतील असे अपशब्द उच्चारून टिका केली आहे . त्याबद्दल प्रथमतः केतकी चितळे हीचा जाहिर निषेध करतो . शरद पवाराचे हिमालया एवढे उचीचे उत्तुंग नेतृत्व या महाराष्ट्रला व देशाला मिळाले असुन शरद
पवारांच्या बदल अपशब्द वापरून त्यांची उंची गाठण्याची हिंमत व धमक महाराष्ट्रातच नव्हे दर देशात दुसऱ्या कोणत्याही कोणामध्येही नाही . गेली ५५ वर्षे देशाच्या व राज्याच्या राजकारणात
सामाजिक , राजकीय , शैक्षणिक , क्रिडा , साहित्यीक , आरोग्य विषयक , कृषी , सहकार , पशुसंवर्धन , औद्योगिक क्षेत्रासह व आपत्याकालीन परिस्थितीमध्ये साहेबानी सत्ता असो वा नसो समाजाचे
प्रश्न सोडविण्याचे काम केले आहे . छत्रपती शाहू महाराज , महात्मा फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचा वारसा पुढे नेवून हा महाराष्ट्र सुजलाम सुफलाम् घडविण्याचे काम आदरणीय साहेबांनी केले आहे .
परंतु अशा नेतृत्वावर अपशब्द वापरून टिका करून काही दिड दमडीचे लगे मुंगे प्रसिद्धी मिळवण्यासाठी साहेबांवर टिका करतात . तशीच टिका केतकी चितळे या महिलेने केली आहे . तीचा आम्ही
बारामती तालुका व शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे व तमाम बारामतीकरांचे वतीने जाहिर निषेध करतो व केतकी चितळे या अँड नितीन भावे यांचेवर कायदेशीर कारवाई व्हावी व भविष्यात असे कोणी कृत्य केल्यास
त्यास जोरदार उत्तर देवुन आंदोलन छेडले जाईल असा इशारा देण्यात आला आहे. या निवेदनाद्वारे वनिता बनकर,आरती गव्हाळे,अनिता गायकवाड यांच्या यांनी दिला आहे.