माय महाराष्ट्र न्यूज:राष्ट्रवादी काँग्रसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर शेलक्या भाषेत टीका करणारी अभिनेत्री केतकी चितळे हिच्यासमोरील अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कारण,
सध्या राज्यभरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केतळी चितळे हिच्याविरोधात पोलिसांत तक्रारी करण्याचा सपाटा लावला आहे.दरम्यान बारामती राष्ट्रवादी युवती काँग्रेस भाग्यश्री धायगुडे
यांनी ही केतकी चितळे व नितीन भावे यांना अटक करून गुन्हा दाखल करावा अशी महिला आयोगाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.भाग्यश्री धायगुडे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की
शरदचंद्रजी पवार यांच्यावर अतिशय खालच्या पातळीवर जाऊन अभिनेत्री केतकी चितळे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून एक फेसबुक पोस्ट टाकलेली आहे . फेसबूक पोस्ट च्या
माध्यमातून तिने आदरणीय पवार साहेबांचा मोठ्या प्रमाणावर अवमान केला असल्याचे दिसून आले आहे . त्याचबरोबर अजून एका गोष्टीचं जास्त वाईट वाटतं कि , पोस्ट टाकत असताना
तिने सुरुवातीलाच तुका म्हणे म्हणजे तिने तुकाराम महाराजांचा सुद्धा अपमान केला आहे . सुरवातीला हे वाक्य टाकून तिने महाराष्ट्रातील संपूर्ण वारकरी संप्रदायाने देखील या ठिकाणी तिने अपमान
करून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे . केतकी चितळे सारख्या मूर्ख आणि माथेफिरू व्यक्तींनी भविष्यात अशा प्रकारच्या गोष्टी करू नये याकरिता तिच फेसबुक पेज , ट्विटर , इंस्टाग्राम ,
सर्व अकाउंट आपण कायमस्वरूपी ब्लॉक करावे अशी आम्ही राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभागाच्या वतीने मागणी करीत आहोत . इथून मागे सुद्धा केतकी चितळे यांनी खूप खालच्या पातळीवर
जाऊन काही जातीवाचक गोष्टी शेर केल्या होत्या , तसेच काही ज्येष्ठ व्यक्तींच्या बाबतीत याअगोदर सुद्धा तिने वादग्रस्त विधान केलेले होते . असे काहीतरी विधान करून सतत प्रसिद्धी मिळवायची आणि त्या
प्रसिद्धीच्या माध्यमातून आपले काम साध्य करून घ्यायची असा घाणेरडा हेतू डोक्यात ठेवून कैलकी चितळे या पोस्ट शेअर करत असते . तरी सायबर सेल ला माझी कळकळीची विनंती आहे की
तिच्यावर जास्तीत जास्त गंभीर गुन्हा दाखल करून अटक करावी जेणेकरून भविष्यात तिने अशा प्रकारच्या पोस्ट टाकताना शंभर वेळा विचार केला पाहिजे तसेच माझी संबंधित पोलीस खात्याला
विनंती आहे की अभिनेत्री केतकी चितळे हीच मानसिक संतुलन हे व्यवस्थित आहे हे तपासून घेतलं पाहिजेत का तिला मेंटल हॉस्पिटल ची गरज आहे का ? तिला एका सायटीस ची गरज आहे का हे सुद्धा पोलीस खात्याने तपास करून
घ्यावा व तसे काही आढळल्यास तिच्यावर लवकरात लवकर येरवडा येथील मेटल हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट चालू करावी अशी आमची विनंती आहे असे निवेदनात भाग्यश्री धायगुडे यांनी निवेदनाद्वारे म्हटले आहे.