नेवासा/प्रतिनिधी
महिना उजाडला की विद्यार्थ्यांना शाळेचे वेध लागतात दोन महिन्यांच्या सुट्टीनंतर कधी एकदा शाळेत जातोय, मित्र मैत्रीणींना भेटतोय, सुट्टीत केलेली मजा सांगतोय, एकत्र डबा खातोय असं प्रत्येक विद्यार्थ्याला वाटत असतं शाळेचा पहिला दिवस म्हणजे नव्या युनिफॉर्मसोबतच नवे मित्र ,नव्या शिक्षकांची भेट होणं. त्यामुळे विद्यार्थ्यामध्ये एक उत्साह असतो. दरम्यान पहिलीला प्रवेश करणाऱ्या विद्यार्थ्यांचे शाळेतील पहिले पाऊल आज पडले आणि कै. सो.बदामबाई धनराज गांधी विद्या मंदिर शाळे कडून या विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.
यावेळी नेवासा प्रेस क्लबचे अध्यक्ष मोहन गायकवाड, पत्रकार शंकर नाबदे, पत्रकार रमेश शिंदे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वही पुस्तक पेन देण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांमध्ये देखील उत्साह दिसून येत होता.
शाळेतही अनेक चिमुकल्यांचा पहिला दिवस होता. पहिल्यांदाच हे विद्यार्थी शाळेची पायरी चढले होते. या मुलांच्या स्वागतासाठी शिक्षकांनी देखील जय्यत तयारी केली होती.
यावेळी मुख्याध्यापक विश्ववनाथ नानेकर, संजय चौधरी, रविकांत मरगळ, राजेंद्र नाईक,प्रशांत खंडाळे,बाबासाहेब दहातोंडे, अजय आव्हाड, जनार्दन शिंदे, सौ.सुलभा उंडे , सुरेखा चौघुले, लता निकाळे, अनुराधा वाळूंजकर , राजू पटारे, आदि उपस्थित होते.