Saturday, September 23, 2023

आषाढी वारी करण्यास इच्छूक असल्यास, एसटी थेट तुमच्या गावात येणार

WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:आषाढी एकादशीनिमित्त भाविकांना पंढरपूरला जाण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने जादा बस उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यानुसार अहमदनगर विभागाच्या वतीने 385 जादा बस पंढरीच्या दिशेने धावणार आहेत. आषाढी एकादशीनिमित्त पांडुरंगाच्या दर्शनाची आस भाविकांना लागते. त्यामुळे गावागावांतून वारकर्‍यांच्या दिंड्या निघतात.बहुतांश भक्त बसने पंढरीला जाणे पसंत करतात.

या भाविकांच्या सेवेसाठी एसटी महामंडळ दरवर्षी जादा बसेस सोडतात. अहमदनगर विभागाने जिल्ह्यातील 235 बसचे नियोजन केले आहे. याशिवाय धुळे विभागाकडून 75 आणि जळगाव विभागाकडून 75 बस मागविल्या आहेत. या दोन्ही

जिल्ह्यांतून 150 बस उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे अहमदनगर विभागाच्या वतीने एकूण 385 बसची व्यवस्था केली आहे.75 वर्ष पूर्ण झालेल्या व्यक्तींना एसटीचा प्रवास मोफत करण्यात आलेला आहे. याशिवाय महिला वर्गाला सरसकट 50 टक्के प्रवासात

सवलत दिली आहे. त्यामुळे पंढरीच्या वारीला मोठी गर्दीॅ होण्याची शक्यता आहे. अहमदनगरहून 25 जूनपासून जादा बसेस पंढरीला सोडण्यात येणार आहेत. मात्र, भाविकांची मागणी आणि गर्दी वाढल्यास 20 जूनपासून देखील जादा बसेस

सोडल्या जातील, असे विभागीय वाहतूक अधिकारी अनिल भिसे यांनी सांगितले.एखाद्या गावातून 40 वा त्यापेक्षा जादा भाविक ग्रुपने पंढरीची वारी करण्यास इच्छूक असल्यास, महामंडळाची बस थेट गावात येण्यास तयार आहे. त्यामुळे संबंधित गावांतील भक्तांनी

लवकरात लवकर जवळच्या आगार व्यवस्थापकांशी संपर्क साधावा, असे आवाहन अहमदनगर विभागाने केले आहे.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!