माय महाराष्ट्र न्यूज:सराफ बाजार सोन्या-चांदीचे भाव घसरले आहेत. मागच्या काही महिन्यांपासून सोन्या-चांदीच्या दराने मोठी उसळी घेतली होती म्हणून ग्राहकांची तारांबळ उडाली होती.
अशातच सोन्या-चांदीचे भाव घसरले आहेत. RBI च्या निर्णयावर पाऊल टाकत अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने व्याज दरवाढीला ब्रेक लावला. या निर्णयामुळे सोन्या-चांदीच्या किमतींत घसरण होताना दिसत आहे.
अशातच एमसीएक्सने सोन्याचा भावात तब्बल दोन महिन्यानंतर कमी झाले आहे.MCX वर सोन्याचे भाव 58,902 रुपये प्रति 10 ग्रॅमसाठी आहे तर चांदीची फ्युचर्स किंमत प्रति किलो 1,207 रुपये घसरून 71,444 रुपये झाली आहे.MCX नुसार मुंबईत
सोन्याचा भाव 22 कॅरेटसाठी 5470 रुपये तर 24 कॅरेटसाठी 5967 प्रति ग्रॅम आहे. सराफा बाजारात आज सोन्या व चांदीच्या दरात ३०० रुपयांनी घसरण झाली आहे.24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आहे आणि 22 कॅरेट अंदाजे 91% शुद्ध असतं. 22 कॅरेट
सोन्यात तांबे, चांदी (Silver), जस्त यांसारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात.