माय महाराष्ट्र न्यूज:मराठवाड्यातील काही शेतकऱ्यांनी BRSच्या मदतीने तेलंगणाचं मार्केट गाठून आपला कांदा विकला आहे. सध्या महाराष्ट्रातल्या क्विंटलभर कांद्याला 100-200 रुपये भाव मिळत असताना,
हाच कांदा तेलंगाणामध्ये सरासरी 1800 रुपये दराने खरेदी केला.ज्यांच्याकडे काढलेला कांदा आहे, त्यांना 100 ते 200 रुपयांच्या मातीमोल भावानं कांदा विकावा लागत आहे. मात्र त्याच कांद्याला तेलंगणामध्ये तब्बल 1800 रुपयाचा भाव मिळतोय.
भाव पडल्यामुळे आपल्याकडे डोळ्यात पाणी आणणाऱ्या त्याचे कांद्याने वाहतूक खर्च, अडत, हमाली वजा जाता सरासरी 1200 रुपये हातात पडल्यानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलले.
तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी मराठवाड्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी बीआरएसच्या स्थानिक नेत्यांना सूचना केली होती. त्यानुसार मागच्या आठवड्यात कन्नडमधून 6 ट्रक तेलंगणाकडे रवाना झाले होते. आता आणखी 20-25 ट्रक माल जात आहे.
महाराष्ट्रापेक्षा तेलंगणामध्ये चांगला भाव मिळाल्याने, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर, गंगापूर, पैठण, सिल्लोडसह नाशिक, येवला आदी भागातूनही तेलंगणात कांदा पाठविण्यासाठी शेतकऱ्यांचे फोन येत आहेत. कांद्याचा दर्जा व गुणवत्तेनुसार भाव मिळत आहे.
बारदानाही मोफत आहे, वाहतूक भाडे व इतर खर्च वजा जाता उर्वरित पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होत आहेत.