माय महाराष्ट्र न्यूज:औरंगाबादमधील एमआयएमचे खासदार इम्तियाज जलिल बुधवारी सायंकाळी अहमदनगरमध्ये येताच त्यांची सभा असलेल्या
ठिकाणापासून जवळच असलेल्या रंगभवनमध्ये कचर्याला आग लागली. ‘मी ज्या ठिकाणी जातो, तेथे आग लागते’ असे वक्तव्य खा. जलील यांनी केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.
तेलंगणचे आमदार अकबरूद्दीन ओवैसी यांच्यासह खा. जलील यांनी खुलताबाद येथे जाऊन मुघल आक्रमक औरंगजेबच्या समाधीचे दर्शन घेतले होते. तेंव्हापासून हे दोन्ही नेते राज्यातील
भाजप, मनसे, शिवसेना आणि हिंदुत्त्ववादी संघटनांचे लक्ष्य आहेत. त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे. त्यातच खा. जलील नगरमध्ये येणार म्हटल्यानंतर प्रशासनाचे या दौर्यावर बारकाईने लक्ष होते.
खा. जलील येताच एमआयएमकडून त्यांच्या स्वागतासाठी आतषबाजी करण्यात आली. त्यातील एक फटाका रंगभूवनमध्ये असलेल्या कचर्यावर पडल्याने आग लागली. नगर शहरात
सध्या फेरिवाले आणि व्यापारी यांच्यातील अतिक्रमणावरून वाद निर्माण झालेले आहेत. या वादावरही खा. जलील यांनी वक्तव्य केल्याने वातावरण तापले आहे. खा. जलिल यांची सर्जेपुरा भागात ईद मिलन,
शिरखुरमा पार्टी आणि सभा होती. कार्यक्रमाच्या ठिकाणी फटाक्यांची आतषबाजी झाली. त्यातून ही आग लागली. ती तातडीने विझविण्यातही आली. मात्र खा. जलील यांनी भाषणाच्या
सुरूवातीलाच आगीचा संदर्भ देत ‘मी जिथे जिथे जातो तिथे आग लागते. मी भाषणाला सुरुवात अजूनकेली नाही, तोच आग लागली. आता मी काय करू,’ असे म्हटले. मुख्य बाजार पेठेतील
फेरीवाल्यांबाबत ते म्हणाले, कायद्याच्या नावाखाली रोजगार काढून घेतला गेला आहे. मी येथील प्रशासनाला आव्हान देतो की, पुन्हा असा प्रकार केला तर मी स्वतः येथे येईल. गरिबीची जात अथवा
धर्म नसतो. कोणी बळाचा वापर करून, कोणत्या नेत्याच्या सांगण्यावरून रोजगार काढून घेत असतील तर मी अशा सर्व नेत्यांना सांगू इच्छितो की त्यांनी एका बाजूला उभे रहावे. मी एका बाजूने उभा राहील.