Thursday, June 30, 2022

मोठी बातमी: महाराष्ट्रात 7 हजार जागांसाठी होणार पोलीस भरती

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: महाराष्ट्र  सरकारने आता पुन्हा एकदा पोलीस भरतीची तयारी सुरू केली आहे. राज्यात लवकरच 7 हजार पदांची मेगाभरती होणार आहे.

या भरती प्रक्रियेनंतर आणखी एक जम्बो पोलीस भरती होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.मुंबईत बीडीडी चाळमधील पोलीस वसाहतीत पोलिसांना ५० लाखांत घर देण्याची

घोषणा करण्यात आली आहे. त्यानंतर आता पुन्हा एकदा राज्य सरकारने पोलीस भरतीची घोषणा केली आहे.राज्यात लवकरच तब्बल 7 हजार पदांची भरती प्रक्रिया पार पडणार आहे.

पोलीस कॉन्स्टेबलपदासाठी एकाच वेळी भरती प्रक्रिया पार पडणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.यापूर्वीच मागील काही वर्षांमध्ये पोलीस भरती करण्याचे नियोजन झाले होते. पण मध्यंतरी

कोव्हिडमुळे दीड ते दोन वर्ष पूर्ण क्षमतेने पोलीस भरती झाली नव्हती. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मागील अर्थसंकल्पीय अधिवेशनात पोलीस भरती करण्याबाबत सुचक वक्तव्य केलं होतं.

आता पुढील दोन महिन्यात पहिल्या टप्प्यामध्ये सात हजार पदांची पोलीस भरती केली जाणार आहे. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात साधारणता साडेपाच हजार पेक्षा जास्त पोलीस कॉन्स्टेबल

पदाची भरती केली जाणार आहे. सर्व आरक्षणासह या पदांची भरती होणार आहे.

ताज्या बातम्या

राज्यात पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंड्यात भाजपचा जल्लोष

भेंडा राज्यात भारतीय जनता पार्टीची पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंडा येथे फटाके फोडून व पेढे वाटून भाजपने जल्लोष केला. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे...

जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणेसाठी उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत-तनपुरे

अहमदनगर/प्रतिनिधी शासनस्तरावर यासाठी एका अभ्यासगटाची नेमणुक होऊन मुंबईसाठी पाणी पुरवठा करणे आणि जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणे यासाठीच्या योजना तयार करण्याबाबत उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत...

समर्थ पाउलबुद्धेचा सत्कार

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक व राष्ट्रवादी साखर कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाउलबुद्धे यांचे चिरंजीव व लोणीच्या सैनिकी स्कुलचा...

शिक्षण परिषेदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात नदीकी पाठशाला,नदी साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येईल-शिक्षण आयुक्त सुरज मांढरे

पुणे/प्रतिनिधी नदी साक्षरते बाबत अगदी बालवया पासून शालेय शिक्षणातून याचा अंतर्भाव केल्यास अत्यंत सकारात्मक परिणाम दिसेल.त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) माध्यमातून महाराष्ट्रात...

नेवासा तहसीलदारांच्या बनावट सही-शिक्क्याचा वापर करून 16 लाखाचा अपहार

नेवासा तहसीलदारांचा बनावट शिक्का व खोट्या सहीचा वापर करून नैसर्गिक आपत्तीचे पैसे बेकायदेशीरपणे स्वतःच्या खात्यात वळवून अपहार केल्या प्रकरणी नेवासा तहसीलदारांच्या फिर्यादी वरून देडगावच्या कोतवाला विरुद्ध...

फळबाग तोडणी मजूरांचा टेंपो उलटला;एक ठार तर आठ जखमी

नेवासा चालकाचे हलगर्जीपणामुळे फळबाग तोडणेकरीता मजूर घेऊन जाणारा टेंपो पलटी पलटी होऊन टेंपो मधील एकजण ठार तर आठ जण जखमी झाल्याची घटना शुक्रवार दि.24 रोजी...
error: Content is protected !!