नेवासा
नेवासा तालुक्यातील तरवडी येथील दीनमित्रकार मुकुंदराव पाटील स्मारक समितीच्या वतीने दिले जाणाऱ्या दीनमित्रकार मुकुंदराव पाटील साहित्य पुरस्कारासाठी सत्यशोधकीय साहित्य पाठवण्याचे आवाहन समितीचे सचिव उत्तमराव पाटील यांनी केले आहे.
दीनमित्रकार मुकुंदराव पाटील यांच्या जन्मदिना निमित्त दरवर्षी २० डिसेंबर रोजी सत्यशोधकीय, प्रागतिक विचारांचा प्रसार करणाऱ्या ग्रंथ/साहित्यासाठी विविध पुरस्कार दिले जातात.या वर्षिच्या पुरस्करासाठी सन २०२२ मध्ये प्रकाशित झालेल्या कविता, कथा, कादंबरी, नाटक, ललित गद्य, चरित्र, आत्मचरित्र, समीक्षा, संशोधनपर, इतिहासविषयक, सामाजिक, सांस्कृतिक,वैचारिक, बालसाहित्य, अनुवादीत आदीं प्रकरांतील ग्रंथांच्या २ प्रती ३० ऑक्टोबर २०२३ पूर्वी सचिव,दीनमित्रकार मुकुंदराव पाटील स्मारक समिती, तरवडी, ता. नेवासा जि. अहमदनगर या पत्त्यावर पाठवाव्यात असे आवाहन करण्यात आले आहे.