माय महाराष्ट्र न्यूज: नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील पाथरे परीसरात शिर्डी नाशिक महामार्गावर पाथरे फाट्याजवळ बुधवारी
रात्री एसटी बस (क्रं.एम.एच.14 बी.टी.0709) व कोपरगाव येथील इनोव्हा कार (क्रं.एम.एच.02 ए.वाय.8109) यांच्यात जोराची धडक झाली. त्यात कोपरगाव पंचायत समितीचे माजी सभापती
मच्छिंद्र केकाण व दशरथ पालवे यांचेसह चार जण जखमी झाले आहे.वावी येथील इक्बाल गुलाब अत्तार यांनी वावी येथील पोलीस ठाण्यास खबर दिली आहे. पाथरे हद्दीत पाथरे फाट्याजवळ
शिर्डी-नाशिक महामार्गावर एक राज्य परिवहन मंडळाची बस व कोपरगाव येथील इनोव्हा कार यांच्यात बुधवारी रात्री 08.30 जोराची धडक झाली. त्यात मच्छिंद्र केकाण व सोनारी येथील दशरथ पालवे,
दत्तात्रय सांगळे व आनखी एक असा चार जणांचा समावेश आहे. सिन्नर येथे एका नियोजित ठिकाणी जात असताना त्यांच्या टोयोटा इनोव्हा कारला समोरून येणार्या बसने जोराची
धडक दिली आहे. शिर्डी येथील साईबाबा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले आहे.