Thursday, June 30, 2022

पुढील तीन चार दिवस जोरदार पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:मोसमी पावसाचा प्रवास सुरू असतानाच सध्या राज्याच्या काही भागांत पूर्वमोसमी पावसाच्या सरींची हजेरी आहे.

कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी गुरुवारी (१९ मे) पाऊस झाला. पुढील एक ते दोन दिवस पावसाची शक्यता कायम आहे. त्याचप्रमाणे देशातील पश्चिम-उत्तर,

पूर्वोत्तर आणि दक्षिणेकडील काही राज्यांमध्ये पुढील तीनचार दिवस जोरदार पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.बंगालच्या उपसागरातून

सध्या मोठय़ा प्रमाणावर वारे वाहत आहेत. त्याचप्रमाणे देशात अनेक भागात कमी दाबाचे पट्टे निर्माण झाले आहेत. महाराष्ट्राच्या दक्षिणेकडील भागात प्रामुख्याने बाष्पयुक्त वारे दाखल होत

असल्याने या भागात पाऊस हजेरी लावतो आहे. गुरुवारी सोलापूर, सांगली, जालना, उस्मानाबाद. चंद्रपूर, यवतमाळसह दक्षिण कोकणात काही भागात पूर्वमोसमी पाऊस झाला.देशाच्या विविध

भागातही सध्या जोरदार पाऊस पडत असून, पूर्वोत्तर राज्यांमध्ये पावसाचे प्रमाण अधिक आहे. अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, सिक्कीमसह पश्चिम बंगालमध्ये पुढील तीनचार

दिवस पाऊस होणार आहे. उत्तरेकडील जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, उत्तर राजस्थान, उत्तर प्रदेश आदी राज्यांत, तर दक्षिणेकडील केरळ, कर्नाटकच्या

किनारपट्टीवरही पुढील तीनचार दिवस जोरदार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.र्नैऋत्य मोसमी पावसाने बुधवारी (१८ मे) बंगालच्या उपसागरात पूर्वोत्तर दिशेने काही भागात

प्रगती केली होती. त्यामुळे या भागासह अंदमान-निकोबार बेटांवर सध्या मोसमी पाऊस होतो आहे. गुरुवारी (१९ मे) मोसमी वाऱ्यांनी कोणतीही प्रगती केली नाही. १६ मे रोजी मोसमी

पाऊस अंदमानात दाखल झाल्यापासून बंगालच्या उपसागरातील दक्षिणेकडील भागात त्याची प्रगती झालेली नाही. मात्र, हवामान विभागाच्या अंदाजानुसार मोसमी वाऱ्यांच्या

प्रगतीला पोषक वातावरण आहे. येत्या दोन दिवसांत ते दक्षिण अरबी समुद्रात दाखल होतील, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

ताज्या बातम्या

राज्यात पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंड्यात भाजपचा जल्लोष

भेंडा राज्यात भारतीय जनता पार्टीची पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंडा येथे फटाके फोडून व पेढे वाटून भाजपने जल्लोष केला. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे...

जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणेसाठी उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत-तनपुरे

अहमदनगर/प्रतिनिधी शासनस्तरावर यासाठी एका अभ्यासगटाची नेमणुक होऊन मुंबईसाठी पाणी पुरवठा करणे आणि जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणे यासाठीच्या योजना तयार करण्याबाबत उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत...

समर्थ पाउलबुद्धेचा सत्कार

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक व राष्ट्रवादी साखर कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाउलबुद्धे यांचे चिरंजीव व लोणीच्या सैनिकी स्कुलचा...

शिक्षण परिषेदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात नदीकी पाठशाला,नदी साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येईल-शिक्षण आयुक्त सुरज मांढरे

पुणे/प्रतिनिधी नदी साक्षरते बाबत अगदी बालवया पासून शालेय शिक्षणातून याचा अंतर्भाव केल्यास अत्यंत सकारात्मक परिणाम दिसेल.त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) माध्यमातून महाराष्ट्रात...

नेवासा तहसीलदारांच्या बनावट सही-शिक्क्याचा वापर करून 16 लाखाचा अपहार

नेवासा तहसीलदारांचा बनावट शिक्का व खोट्या सहीचा वापर करून नैसर्गिक आपत्तीचे पैसे बेकायदेशीरपणे स्वतःच्या खात्यात वळवून अपहार केल्या प्रकरणी नेवासा तहसीलदारांच्या फिर्यादी वरून देडगावच्या कोतवाला विरुद्ध...

फळबाग तोडणी मजूरांचा टेंपो उलटला;एक ठार तर आठ जखमी

नेवासा चालकाचे हलगर्जीपणामुळे फळबाग तोडणेकरीता मजूर घेऊन जाणारा टेंपो पलटी पलटी होऊन टेंपो मधील एकजण ठार तर आठ जण जखमी झाल्याची घटना शुक्रवार दि.24 रोजी...
error: Content is protected !!