Thursday, June 30, 2022

पेट्रोल डिझेलचे नवे दर जाहीर जाणून घ्या

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:ऐन महागाईच्या गर्तेत सर्वसामान्यांना सातत्यानं वाढणाऱ्या पेट्रोल-डिझेलच्या दरांपासून दिलासा मिळाला आहे.

गेल्या 44 दिवसांपासून देशात पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. भारतीय पेट्रोललियम कंपन्यांनी आजचे नवे दर जाहीर केले असून आज दरांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

दरम्यान, आज आंतरराष्ट्रीय बाजारात पेट्रोल-डिझेलच्या किमतींत घट झाली आहे. तरीही याचा कोणताही परिणान देशांतर्गत बाजारात झालेला नाही. यापूर्वी 6 एप्रिल रोजी पेट्रोल -डिझेलच्या

किमती वाढल्या होत्या. त्यावेळी पेट्रोलचे दर 80 पैशांनी, तर डिझेलचे दर 80 पैशांनी वाढवण्यात आले होते. आजच्या कच्च्या तेलाच्या किमतींवर नजर टाकली तर आज आंतरराष्ट्रीय

बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये घसरण झाल्याचं पाहायला मिळालं आहे. WTI क्रूड 0.42 डॉलर ते 0.38 टक्क्यांनी घसरून प्रति बॅरल 109.47 डॉलरवर व्यापार करत आहे.

दुसरीकडे, ब्रेंट क्रूडबद्दल बोलायचं झालं तर, 0.32 डॉलर म्हणजेच, 0.26 टक्क्यांनी वाढल्यानंतर ते प्रति बॅरल 111.84 डॉलरवर व्यवहार करत आहे.आज आठवड्याच्या पहिल्या

दिवशी देशाची राजधानी दिल्लीत पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत कोणताही बदल झालेला नाही. सोमवारी दिल्लीत 1 लिटर पेट्रोलची किंमत 105.41 रुपये आणि 1 लिटर डिझेलची

किंमत 96.67 रुपये आहे. तर देशाच्या आर्थिक राजधानीचं शहर असणाऱ्या मुंबईत एक लिटर पेट्रोलसाठी 120.51 रुपये, तर एक लिटर डिझेलसाठी 104.77 रुपये मोजावे लागत आहेत.

इंडियन ऑईलचं IndianOil ONE Mobile App तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.

इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price) सोप्या पद्धतीने पाहता येतील.

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती ( Petrol Diesel Price ) एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या

शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत)

 

 

ताज्या बातम्या

राज्यात पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंड्यात भाजपचा जल्लोष

भेंडा राज्यात भारतीय जनता पार्टीची पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंडा येथे फटाके फोडून व पेढे वाटून भाजपने जल्लोष केला. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे...

जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणेसाठी उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत-तनपुरे

अहमदनगर/प्रतिनिधी शासनस्तरावर यासाठी एका अभ्यासगटाची नेमणुक होऊन मुंबईसाठी पाणी पुरवठा करणे आणि जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणे यासाठीच्या योजना तयार करण्याबाबत उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत...

समर्थ पाउलबुद्धेचा सत्कार

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक व राष्ट्रवादी साखर कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाउलबुद्धे यांचे चिरंजीव व लोणीच्या सैनिकी स्कुलचा...

शिक्षण परिषेदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात नदीकी पाठशाला,नदी साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येईल-शिक्षण आयुक्त सुरज मांढरे

पुणे/प्रतिनिधी नदी साक्षरते बाबत अगदी बालवया पासून शालेय शिक्षणातून याचा अंतर्भाव केल्यास अत्यंत सकारात्मक परिणाम दिसेल.त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) माध्यमातून महाराष्ट्रात...

नेवासा तहसीलदारांच्या बनावट सही-शिक्क्याचा वापर करून 16 लाखाचा अपहार

नेवासा तहसीलदारांचा बनावट शिक्का व खोट्या सहीचा वापर करून नैसर्गिक आपत्तीचे पैसे बेकायदेशीरपणे स्वतःच्या खात्यात वळवून अपहार केल्या प्रकरणी नेवासा तहसीलदारांच्या फिर्यादी वरून देडगावच्या कोतवाला विरुद्ध...

फळबाग तोडणी मजूरांचा टेंपो उलटला;एक ठार तर आठ जखमी

नेवासा चालकाचे हलगर्जीपणामुळे फळबाग तोडणेकरीता मजूर घेऊन जाणारा टेंपो पलटी पलटी होऊन टेंपो मधील एकजण ठार तर आठ जण जखमी झाल्याची घटना शुक्रवार दि.24 रोजी...
error: Content is protected !!