Friday, July 1, 2022

तुम्ही इलेक्ट्रॉनिक बाईक विकत घेताय सावधान

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:ईलेक्ट्रीक बाईकमध्ये वेग वाढीसाठी केलेले बेकायदा बदल आणि त्यामुळे वाहने जळण्याचे वाढते अपघात पाहून परिवहन विभागाने बडगा उगारला आहे. या ई-बाईक

जर राज्य परिवहन विभागाच्या मान्यता नसलेल्या विक्रेत्याकडून खरेदी केली तर उत्पादक, डीलर आणि चालकांवरदेखील मोटार वाहन कायद्याप्रमाणे गुन्हे दाखल होणार आहेत.

मोटार वाहन कायद्यानुसार वाहन नोंदणी करण्यापासून बॅटरीवर चालणार्‍या आणि कमी सीसी क्षमतेच्या या बाईक सूट देण्यात आली आहे. त्यामुळे या बाईक चालविण्यास ड्रायव्हींग

लायसन्सची गरज नसते. परंतु याचाच गैरफायदा घेत काही उत्पादक बॅटरीची क्षमता 250 वॅटपेक्षा जास्त वाढवतात तसेच वाहनाची वेगमर्यादा प्रति तास 25 कि.मी.पेक्षा जादा करतात. त्यामुळे

अशा अनधिकृत ई-बाईक्सच्या वापरामुळे रस्ता सुरक्षितेस धोका निर्माण होत असल्याने परिवहन विभागाने आरटीओना नवे आदेश जारी केले आहेत.उत्पादकास वाहन विक्री करण्यापूर्वी त्या

वाहनाच्या मॉडेलची चाचणी ही केंद्रिय मोटार वाहन नियम,1989 च्या नियम126 मध्ये नमूद केलेल्या संस्थांकडून करायला हवी असे बंधन आहे. हे वाहन विक्री करण्यापूर्वी वाहन

वितरक आणि उत्पादक यांच्याकडे मान्यताप्राप्त संस्थेचा ‘टाईप अ‍ॅप्रुव्हल टेस्ट रिपोर्ट’ आणि परिवहन आयुक्त कार्यालय यांनी जारी केलेल्या परवानगीची प्रत असल्याची खातरजमा करण्याची जबाबदारी

चालकावरच टाकण्यात आली आहे. सरकारने पर्यावरणपूरक धोरण राबविण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र इलेक्ट्रीक वाहन धोरण 2021लागू केले आहे. ई-बाईक्स आणि ई-वाहनांना मोटार वाहन

करातून 100 टक्के सूट दिली आहे. आतापर्यंत राज्यात एकूण 66,482 इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांची नोंदणी झाली आहे.

ताज्या बातम्या

राज्यात पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंड्यात भाजपचा जल्लोष

भेंडा राज्यात भारतीय जनता पार्टीची पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंडा येथे फटाके फोडून व पेढे वाटून भाजपने जल्लोष केला. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे...

जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणेसाठी उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत-तनपुरे

अहमदनगर/प्रतिनिधी शासनस्तरावर यासाठी एका अभ्यासगटाची नेमणुक होऊन मुंबईसाठी पाणी पुरवठा करणे आणि जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणे यासाठीच्या योजना तयार करण्याबाबत उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत...

समर्थ पाउलबुद्धेचा सत्कार

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक व राष्ट्रवादी साखर कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाउलबुद्धे यांचे चिरंजीव व लोणीच्या सैनिकी स्कुलचा...

शिक्षण परिषेदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात नदीकी पाठशाला,नदी साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येईल-शिक्षण आयुक्त सुरज मांढरे

पुणे/प्रतिनिधी नदी साक्षरते बाबत अगदी बालवया पासून शालेय शिक्षणातून याचा अंतर्भाव केल्यास अत्यंत सकारात्मक परिणाम दिसेल.त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) माध्यमातून महाराष्ट्रात...

नेवासा तहसीलदारांच्या बनावट सही-शिक्क्याचा वापर करून 16 लाखाचा अपहार

नेवासा तहसीलदारांचा बनावट शिक्का व खोट्या सहीचा वापर करून नैसर्गिक आपत्तीचे पैसे बेकायदेशीरपणे स्वतःच्या खात्यात वळवून अपहार केल्या प्रकरणी नेवासा तहसीलदारांच्या फिर्यादी वरून देडगावच्या कोतवाला विरुद्ध...

फळबाग तोडणी मजूरांचा टेंपो उलटला;एक ठार तर आठ जखमी

नेवासा चालकाचे हलगर्जीपणामुळे फळबाग तोडणेकरीता मजूर घेऊन जाणारा टेंपो पलटी पलटी होऊन टेंपो मधील एकजण ठार तर आठ जण जखमी झाल्याची घटना शुक्रवार दि.24 रोजी...
error: Content is protected !!