Thursday, June 30, 2022

हेल्मेट घातलं असेल तरी भरावा लागणार दंड

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:हेल्मेट न घालता दुचाकी चालवल्याबद्दल तुम्ही ऐकलं असेलच. पण आता हेल्मेट घातलं असेल तरी चालान कापलं जाऊ शकतं. हे चलनही

थोडं-थोडकं नसून 2 हजार रुपयांचं असेल. हे वाचून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल पण हे सत्य आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने त्याचे सुधारित नियम अधिसूचित केले आहेत. मंत्रालयाच्या

नियमांनुसार, देशात फक्त दुचाकींसाठी बीआयएस-प्रमाणित हेल्मेटचे उत्पादन आणि विक्री करण्याची परवानगी आहे. म्हणजेच बाईक-स्कूटर चालवताना तुम्हाला फक्त ISI मार्कचे हेल्मेट घालावे लागेल.

दुचाकी चालवताना तुम्ही निकृष्ट दर्जाचे किंवा ISI मार्क नसलेले हेल्मेट घातलेले आढळल्यास, मोटार वाहन कायद्याच्या कलम 194D MVA अंतर्गत तुम्हाला 1 हजार रुपये दंड होऊ शकतो

एवढेच नाही तर हेल्मेट बेल्ट तुम्ही घट्ट केला नसेल, तरी तुम्हाला एक हजार रुपये दंड होऊ शकतो. एकंदरीत, जर तुम्ही ISI मार्क असलेले हेल्मेट न घालता घराबाहेर पडलात आणि त्या

हेल्मेटची पट्टीही बांधली नाही, तर डोक्यावर हेल्मेट असूनही तुमचे 2 हजार रुपयांचे चलन कापले जाईल.वाहतूक पोलिसांसमोर तुम्ही कितीही वाद घातलात तरी चालान काही सेकंदात तुमच्या हातात येईल.

नवीन नियमांनुसार आता त्यांना दुचाकीवरून लहान मुलांची वाहतूक करताना विशेष हेल्मेट आणि हार्नेस बेल्ट वापरणे बंधनकारक असणार आहे. हा पट्टा चालत्या बाईक-स्कूटरवरून

मुलांना पडण्यापासून वाचवतो.यासोबतच लहान मुलांना घेऊन जाण्यासाठी वाहनांचा वेग ताशी 40 किमी निश्चित करण्यात आला आहे.

तसे न केल्यास 3 महिन्यांसाठी ड्रायव्हिंग लायसन्स निलंबन तसेच 1,000 रुपये दंड होऊ शकतो.

ताज्या बातम्या

राज्यात पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंड्यात भाजपचा जल्लोष

भेंडा राज्यात भारतीय जनता पार्टीची पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंडा येथे फटाके फोडून व पेढे वाटून भाजपने जल्लोष केला. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे...

जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणेसाठी उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत-तनपुरे

अहमदनगर/प्रतिनिधी शासनस्तरावर यासाठी एका अभ्यासगटाची नेमणुक होऊन मुंबईसाठी पाणी पुरवठा करणे आणि जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणे यासाठीच्या योजना तयार करण्याबाबत उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत...

समर्थ पाउलबुद्धेचा सत्कार

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक व राष्ट्रवादी साखर कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाउलबुद्धे यांचे चिरंजीव व लोणीच्या सैनिकी स्कुलचा...

शिक्षण परिषेदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात नदीकी पाठशाला,नदी साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येईल-शिक्षण आयुक्त सुरज मांढरे

पुणे/प्रतिनिधी नदी साक्षरते बाबत अगदी बालवया पासून शालेय शिक्षणातून याचा अंतर्भाव केल्यास अत्यंत सकारात्मक परिणाम दिसेल.त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) माध्यमातून महाराष्ट्रात...

नेवासा तहसीलदारांच्या बनावट सही-शिक्क्याचा वापर करून 16 लाखाचा अपहार

नेवासा तहसीलदारांचा बनावट शिक्का व खोट्या सहीचा वापर करून नैसर्गिक आपत्तीचे पैसे बेकायदेशीरपणे स्वतःच्या खात्यात वळवून अपहार केल्या प्रकरणी नेवासा तहसीलदारांच्या फिर्यादी वरून देडगावच्या कोतवाला विरुद्ध...

फळबाग तोडणी मजूरांचा टेंपो उलटला;एक ठार तर आठ जखमी

नेवासा चालकाचे हलगर्जीपणामुळे फळबाग तोडणेकरीता मजूर घेऊन जाणारा टेंपो पलटी पलटी होऊन टेंपो मधील एकजण ठार तर आठ जण जखमी झाल्याची घटना शुक्रवार दि.24 रोजी...
error: Content is protected !!