Saturday, September 23, 2023

आधारकार्ड संदर्भात अत्यंत महत्त्वाची बातमी…

WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:आधारकार्ड विनामूल्य अपडेट करून घेण्यासाठी आधी 14 जून 2023 पर्यंतची मुदत देण्यात आली होती. आता आधारकार्ड फ्री अपडेट करण्याकरिता 14 सप्टेंबर 2023 पर्यंतची मुदतवाढ देण्यात आली आहे.

ही मुदत संपेपर्यंत पैसे न देता अपडेट करून घेता येईल.आधारकार्डमध्ये नोंदवलेली माहिती अर्थात नाव, पत्ता, मोबाईल नंबर पैकी कोणत्याही माहितीत बदल करणे शक्य आहे. आधार क्रमांकासोबत संलग्न मोबाईल नंबरवर ओटीपी मागवणे यासाठी आवश्यक आहे.

ओटीपी सबमिट करून आधारमध्ये नोंदवलेल्या माहिती आवश्यक ते बदल करणे शक्य आहे. माहितत बदल करण्यासाठी सक्षम पुरावा म्हणून योग्य ती कागदपत्रे सादर करावी लागतात. ही पूर्ण प्रक्रिया ऑनलाईन असल्यामुळे ठराविक कालावधीत सहज पूर्ण होते.

आधारमधील माहितीत बदल करण्यासाठी साधारणपणे नवे अॅड्रेस प्रूफ म्हणून ताजे विजेचे बिल किंवा फोनचे बिल अपलोड करणे हिताचे. या बिलात नव्या पत्त्याचा उल्लेख असेल तर माहितीत बदल करणे सोपे होते.आधारमध्ये नमूद पत्त्यात बदल करण्यासाठी

टप्प्याटप्प्याने करा ही कृती https://myaadhaar.uidai.gov.in/ वर जा लॉग इन करा आणि नाव, लिंग, जन्म तारीख ही माहिती द्या अपडेट आधार ऑनलाईन या पर्यायावर क्लिक करा डेमोग्राफिक ऑप्शनमधून अॅड्रेस हा पर्याय निवडा. अपडेट करण्यासाठी पुढील टप्प्याच्या दिशेने जा

ताजे विजेचे बिल किंवा फोनचे बिल अपलोड करा. या बिलात नव्या पत्त्याचा उल्लेख असेल तर माहितीत बदल करणे सोपे होईल.14 सप्टेंबर 2023 पर्यंत पैसे न भरता आधारमधील अॅड्रेस अपडेट करून घेता येईल

एक सर्विस रिक्वेस्ट नंबर अर्थात SRN जनरेट होईल. या SRN आपल्या आधार अपडेट रिक्वेस्टचे ट्रॅकिंग करता येईल.आपण सादर केलेल्या कागदपत्रांची तपासणी पूर्ण करून नंतर आपल्या विनंतीवर निर्णय घेतला जाईल. निर्णय झाल्यावर संलग्न मोबाईलवर SMS येईल

आधार नॉमिनेशन, आधार पीव्हीसी स्टेटस बाबत माहितीसाठी 1947 कधीही फोन करू शकता. हा 24 तास कार्यरत असलेला टोल फ्री नंबर आहे.पत्त्यातील बदलासाठीची विनंती सबमिट केल्यानंतर लगेच URN संलग्न मोबाईलवर SMS द्वारे पाठवला जातो.

https://ssup.uidai.gov.in/checkSSUPStatus/checkupdatestatus वर UNR टाकून ट्रॅकिंग करू शकता.जेव्हा राहण्याचे ठिकाण बदलते आणि किमान 6 महिने किंवा त्यापेक्षा जास्त काळासाठी नव्या पत्त्यावर राहणार असाल तर पत्ता अपडेट करून घेणे हिताचे

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!